History of Maharashtra

जीएसटी म्हणजे 'गुड अँड सिंपल टॅक्स' : पंतप्रधान

pm-modi-on-gst-launcing-ceremony-latest-update


नवी दिल्ली l DNA Live24 - देशाच्या अर्थव्यवस्थेत बदल घडवणाऱ्या जीएसटीचा लोकार्पण सोहळा संसदेच्या मुख्य सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जीएसटीची नवी व्याख्या देशवासीयांना सांगितली. जीएसटी म्हणजे, वस्तू आणि सेवा करासोबतच गुड अॅण्ड सिम्पल टॅक्स आहे. असं त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे, त्यांनी यावेळी सरदार वल्लभाई पटेल यांच्या कार्याचा उल्लेख केला. मोदी म्हणाले की, ”देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी देशभरातील संस्थानं खालसा करुन देशाला एकसंध केलं. तर आज लागू होणाऱ्या जीएसटीमुळे देशाची अर्थव्यवस्था एका सूत्रात बांधली जाईल.”

-------------------------

-----------------------------

शिवाय ज्याप्रमाणे चष्म्याचा नंबर वाढल्यावर तो बदलताना जितका त्रास होतो, त्याचप्रमाणे ही नवी करप्रणाली अंमलात आल्यानंतर ती आत्मसात करण्यासाठी थोडाकाळ त्रास सहन करावा लागेल, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

पंतप्रधानांनी यावेळी गीतेतील 18 अध्यायांप्रमाणेच जीएसटीसाठी स्थापन झालेल्या काऊन्सिलच्या 18 बैठका झाल्या असल्याचं सांगितलं. तसेच जीएसटीमुळे देशाच्या इतिहासात मोठा बदल घडेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उद्योग क्षेत्राला याच्या फायद्याबद्दल बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या नव्या व्यवस्थेमुळे 20 लाखापर्यंतची उलाढाल असणाऱ्या व्यापाऱ्यांना पूर्ण सूट मिळाली आहे. तर 75 लाखापर्यंतची उलाढाल असणाऱ्या थोडाच कर भरावा लागेल. देशातल्या गरिबांसाठी ही नवी करप्रणाली फायदेशीर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितंल.

तसेच या व्यवस्थेमुळे भ्रष्टाचार आणि काळा पैसा बाळगण्यावर चाप बसेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. या व्यवस्थेमुळे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्यांना चांगले दिवस येतील, असंही ते यावेळी म्हणाले.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget