History of Maharashtra

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तिसगावात ३ तास रस्तारोको


पाथर्डी । DNA Live24 - पाथर्डी तालूक्यातील मांडवे येथील सातवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर एका अज्ञात व्यक्तीने बलात्कार केला. हा संतापजनक प्रकार शुक्रवारी (दि २१ जुलै) सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला. मुलीच्या नातेवाईकांनी व सर्वपक्षीय कार्यकत्यांनी तिसगावात नगर पाथर्डी रस्त्यावर तीन तास रस्ता रोको आंदोलन केले. आरोपीचा तत्काळ शोध घेवुन त्याला अटक करण्याची मागणी केली.

मांडवे येथील मुलगी शुक्रवारी सकाळी नऊच्या तिसगावकडे शाळेसाठी पायी निघाली. तिची आई तिच्याजवळ उभी होती. एक अनोळखी मोटारसायकलस्वार तेथुन तिसगावकडे जात असतांना मुलीच्या आईने त्याला थांबवून मुलीला शाळेत सोडण्याची विनंती केली. आईने अनोळखी व्यक्तीच्या मोटारसायकलवर मुलीला बसुन दिले. मात्र त्या नराधमाने काही अंतर पुढे गेल्यावर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. नंतर तिला पुन्हा मोटारसायकलवर बसवुन तिसगाव मिरी रोडवरील चौकात उतरून दिले. तो तेथुन पसार झाला.

अत्याचारित मुलगी रस्त्याच्या कडेला उभी राहुन रडू लागली. त्यावेळी मांडवे व तिसगावच्या ग्रामस्थांनी चौकशी केली असता घडलेला प्रकार तिने सांगितला. लोकांनी मुलीला प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. नंतर तिला नगरला हलवण्यात आले. शालेय विद्यार्थीनीवर अत्याचार झाल्याची माहिती समजल्याने संतप्त नातेवाईकांनी व कार्यकर्त्यानी वृध्येश्वर चौकात टायर जाळत तीन तास रस्ता रोको आंदोलन केले.

आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली. पोलिस निरीक्षक पांडूरंग पवार व तहसीलदार नामदेव पाटील आंदोलनस्थळी आल्यानंतर त्यांना मात्र आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. येत्या आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याचे लेखी आश्वासन निरीक्षक पवार यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात तिसगावच्या शरदचंद्र पवार कंन्या विद्यालय व श्री वृधेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या विदयार्थिनी देखील सहभागी झाल्या होत्या.

रेखाचित्र जारी - दरम्यान, पीडित मुलीने व तिच्या आईने सांगितलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी संशयित आरोपीचे रेखाचित्र जारी केले आहे. या आरोपीबदद्ल कोणाला काही माहिती असल्यास तत्काळ पाथर्डी पोलिस स्टेशन किंवा नियंत्रण कक्षामध्ये (१०० नंबरवर) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget