History of Maharashtra

‘आर के टू आर के’तून उलगडला सुवर्णकालीन इतिहास

अहमदनगर । DNA Live24 - नगर सीए शाखेतर्फे सीए स्थापना दिनानिमित्त माउली सभागृहात आयोजित मनोरंजनातून माहिती देणारा ‘आर के टू आर के’ – ‘कुछ खास दिल के पास’ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. भारतातील चित्रपटाची सुरवात मूकपट, कृष्णधवल ते रंगीत सिनेमा, गायक, गाजलेले हिरो व हिरोईन व त्यांचा जीवनपट माहिती व त्या कलाकारांची अदा सादर करण्यात आली.

आयएमएसच्या माजी विद्यार्थ्यांनी राजकपूर, गुरुदत्त, किशोर कुमार, जॉनी वॉकर, भगवान दादा, मीनाकुमारी, राजेंद्र कुमार, हेलन, मधुबाला, देव आनंद, शम्मी कपूर, मेहमुद, राजेश खन्ना या कलाकारांची अदा सादर केली. त्यांचा अभिनय उपस्थितांची मने जिंकून गेला. या कार्यक्रमाचे निवेदन सीए ज्ञानेश कुलकर्णी व गौरी जोशी यांनी केले.

सिनेजगताला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तने सीए ज्ञानेश कुलकर्णी निर्मित व दिग्दर्शित हिंदी चित्रपटातील दिग्गज कलाकार राजकपूर ते राजेश खन्ना यांच्या काळातील आठवणी, माहिती जीवन प्रवास याचा सांगीतिक व कलाकारांच्या अदातून व्यक्त होणारा बहारदार कार्यक्रम ‘आर के टू आर के’ माउली सभागृहात आयएमएसच्या माजी विद्यार्थ्यांनी सादर केला.

विक्रांत मनवेलिकर यांनी केलेली नाविन्यपूर्ण प्रकाश व्यवस्था व आभिजीत क्षिरसागर यांनी मंच व्यवस्था सांभाळली. सीए कुलकर्णी म्हणाले, आयएमएसमधील राष्ट्रीय परिषदेत डॉ. शरद कोलते यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय चित्रपटचा सुवर्णकाळ व गाजलेले कलाकार यांची माहिती नव्या पिढी बरोबरच सर्वांना व्हावी या हेतूने या कार्यक्रमाची निर्मिती केली.

सहभागी विद्यार्थी व्यावसायिक कलाकार नसूनही त्यांनी मेहनत व जीव ओतून काम केले. या कार्यक्रमामुळे नामवंत चित्रपट कलाकाराची परिपूर्ण माहिती लोकांसमोर आली. यशासाठी संघर्ष तर आवश्यक पण अपयश पचविण्याची ताकदही लागते हे कळले. शो मस्ट गो ऑन हे तत्व चित्रपट क्षेत्राला नव्हे तर सर्वत्र लागू होते, हा अनुभव यातून मिळाला.

अहमदनगर सीए शाखेचे अध्यक्ष प्रसाद भंडारी, सचिव डॉ. परेश बोरा, खजिनदार किरण भंडारी, सदस्य सनीत मुथा, सुशील जैन, मोहन बरमेचा, अजय मुथा, मिलिंद जांगडा यांच्या हस्ते या कार्यक्रमातील सहभागी कलाकारांचा सत्कार करण्यात आला. प्रसाद पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. या उपक्रमासाठी डॉ. विक्रम बार्नबस, मनोज वाघमारे, मर्लिन एलिशा यांचे सहकार्य लाभले.

सीए नगर शाखा अध्यक्ष भंडारी यांनी वर्षभरात राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. ‘आर के टू आर के’ कार्यक्रमाने जुन्या गाण्याचा, अभिनेत्यांच्या अभिनयाचा खरा आनंद प्राप्त झाल्याचेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातिल मान्यवर उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget