728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

स्नेहालयातील मुलांची ब्युटिशिनयकडून हेअरस्टाईल


अहमदनगर । DNA Live24 - समर्पण सेवा संस्थेच्या सामाजिक जाणिवेतून स्नेहालयातील सर्व मुला-मुलींची ब्युटिशियनकडून हेअर स्टाईल करण्यात आली. हा उपक्रम समर्पण सेवा संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा रुपा पंजाबी यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आला. यावेळी पंजाबी म्हणाल्या, समर्पण सेवा संस्था सर्वसामान्य, उपेक्षित व गरजूंकरिता योगदान देणारी संस्था आहे.

जिथे गरज आहे, तेथे तातडीने मदत करण्याच्या दृष्टीने आम्ही काम करत आहोत. नगरमध्ये स्नेहालय ही संस्था मुलांकरिता उत्कृष्ट काम करीत आहे. कुठल्याही गोष्टीची उणीव येथील मुलांना भासत नाही. स्नेहालयातील विद्यार्थी इतर मुलांप्रमाणेच चांगले दिसावेत, या उद्देशाने सर्व मुला-मुलींची ब्युटिशिनयनच्या सहकार्याने वेगवेगळ्या हेअरस्टाईल केल्या जातात. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व खुलून दिसणार आहे. समर्पण सेवा संस्थेच्या सर्व महिला सदस्या उपक्रमात सहभागी झाल्या.

पंजाबी सेवा समितीच्या वतीनेही बहुमोल सहकार्य करण्यात आले. यावेळी पंजाबी सेवा समितीचे अध्यक्ष अजय पंजाबी, सुनिल सहानी, विनोद दिवाण, शशी आनंद, संगीता जग्गी, हेमा बस्सी, हेमजा चित्ता, मिनू चढ्ढा, संगीता सहानी, सुमन सहानी, आशा दुग्गल, गिता दुग्गल, किरण नय्यर, जागृही ओबेरॉय, संध्या वाकचौरे, वर्षा तलवार, निधी दिवाण, आदी उपस्थित होते. यावेळी स्नेहालयातील सर्व मुलांना मिष्टान्न भोजनही देण्यात आले. 
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: स्नेहालयातील मुलांची ब्युटिशिनयकडून हेअरस्टाईल Rating: 5 Reviewed By: DNA Live24