728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

वृक्षारोपणाने अमर कळमकर यांचा वाढदिवस साजरा


अहमदनगर । DNA Live24 - युवा चेतना फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अमर कळमकर यांचा वाढदिवस नुकताच नगर शहरात वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. हा उपक्रम आर्ट ऑफ लिव्हिंग अहमदनगर व युवाचेतना फाउंडेशन, तसेच राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. वाढदिवसानिमित्त लावलेली सर्व रोपे सांभाळली जाणार आहेत, असे योगेश काकडे यांनी सांगितले.

अमर कळमकर हे गेल्या १३ वर्षापासुन आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून ६ राज्यामधे सामाजिक काम केले आहे. यामधे त्यांचे पंढरपूर स्वच्छता अभियान राज्यभर गाजले. तसेच लालबत्ती भागात रक्षाबंधन, आत्तापर्यंत अधिक स्वच्छता अभियाने घेतली आहेत. युवक नेतृत्व प्रशिक्षण शिबिरेही त्यांनी घेतली आहेत. व्यसनमुक्ती व आहाराविषयी मार्गदर्शन केले आहे. म्हणून या सामाजिक कार्यकत्याचा वाढदिवस सामजिक कार्याने साजरा व्हावा, या हेतूने त्यांच्या चाहत्यांनी वृक्षारोपण केले.

यावेळी अमर कळमकर म्हणाले की, वृक्ष ही देशाची खरी संपत्ती असून झाडे लावली, तरच निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन कायम राहणार आहे. हल्ली युवकांचे वाढदिवस डामडौलात व अनावश्यक खर्च करुन साजरे केले जातात. मात्र, वाढदिवसाचे औचित्य साधून पर्यावरण सरंक्षण व सामाजिक सेवेचा संदेश देणारे कार्यकर्ते अत्यंत कमी आहेत. सामाजिक भान असलेल्या अशा कार्यकर्त्यांची व युवकांचीच आज देशाला खरी गरज आहे.

यावेळी अमर कळमकर, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस शेखर होले, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे सुरेश बनसोडे, अंकुश मोहिते, योगेश काकडे, राजेश्वर श्रीराम, दत्ता घाडगे, गणेश ठोंबरे, तुषार केदार, परम काकडे, शुभम कुंभार, दिपक अावारी, अदिनाथ खरात, गौतम कराळे, किरण केदार, भारत गडधे, निलेश डाके, महेश पिटेकर, दिपक जाधव, अमोल साळवे, शुभम गोडसे आदी उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: वृक्षारोपणाने अमर कळमकर यांचा वाढदिवस साजरा Rating: 5 Reviewed By: DNA Live24