History of Maharashtra

नगरच्या तरुणांचे पंढरपुरात स्वच्छता अभियान


अहमदनगर । DNA Live24 - दरवर्षी प्रमाणे नगरमधील तरुण स्वयंसेवकांनी पंढरपूर येथे आषाढी वारीनंतर स्वच्छता अभियान राबवले. आर्ट ऑफ लिव्हींगचे जिल्हा प्रोजेक्ट समन्वयक अमर कळमकर यांच्या मार्गदर्शन खाली ही मोहिम राबवण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून शंभर तरुण पंढरपूर स्वच्छ करण्याची मोहीम राबवितात. आज या मोहिमेत राज्यभरातून १००० पेक्षा जास्त स्वयंसेवक सहभागी झाले आहेत.

सामाजिक भान ठेवत मदतीची अपेक्षा न ठेवता शंभर पेक्षा जास्त तरुन स्वच्छतेचे काम करतात. आज सकाळी ८ वाजता ही मोहीम सुरु झाली होती. त्यात वेगवेगळे गृप तयार करुन व प्रत्येक गृपमागे एक गृपप्रमुख नेमून वेगवेगळ्या भागात गृप सोडण्यात आली. ६५ एकराचे वारीतळ, गोपाळपूर, वाळवंट परिसर, मंदिर परिसर, श्रीकृष्ण मंदिर, भक्ती मार्ग, प्रदक्षिणा मार्ग, नवी पेठ, रामबागेत स्वच्छता करण्यात आली.

प्लॅस्टिक पिशव्यांचा खच, द्रोण, ग्लास, केळीच्या साली, कुजलेले अन्न, तुटक्या चपला, पिशव्या, चंद्रभागेतील कपडे बाहेर काढून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली. नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्वच्छ भारताचा विडा आम्ही उचलेला आहे, असे अमर कळमकर यावेळी म्हणाले. डॉ. अब्दुल कलाम यांना श्रद्धांजली वाहून हा कार्यक्रम ३ वर्षांपुर्वी आम्ही सुरु केला होता, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी योगेश काकडे, सागर शिंदे, अविनाश काकडे, सुधाकर काकडे, दत्तात्रय देशमुख, प्रमोद देशमुख, बळिराम काकडे, महेश काकडे, जितेंद्र शेळके, भागवत काळे, तुषार केदार, दिग्विजय परदेशी, महेश उबाळे, अंकुश वाघमारे, नरेंद्र गायकवाड, संजय देखणे, कुमार खामकर, प्राजक्ता डाके, प्रिती ढुमणे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते या मोहिमेत सहभागी झाले होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget