History of Maharashtra

सामाजिक विकासाच्या मुद्द्यावर युवकांनी एकत्र यावे - शेख


अहमदनगर । DNA Live24 - विविध पक्ष, संघटनांच्या माध्यमातून काम करताना सामाजिक व विकासाच्या मुद्दयावर युवकांनी एकत्र यावे. युवा शक्तीनेच शहराचे रुप पालटणार असून, यासाठी युवा जागृतीची आवश्यकता असल्याची भावना अल खिदमत फाऊंडेशनचे अध्यक्ष जुनेद शेख यांनी व्यक्त केली.

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या शहर जिल्हाध्यक्षपदी शरिफ सय्यद यांची निवड झाल्याबद्दल अल खिदमत फाऊंडेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी जुनेद शेख बोलत होते. याप्रसंगी अल्पसंख्यांक शहर प्रमुख अज्जू शेख, तौसिफ बागवान, साजिद शेख, अल्तमाश जरीवाला, गौरव बुगे, हंझला कुरेशी, सचिन पवार, अफसर खान, तौसिफ शेख, ईस्माइल शेख आदि उपस्थित होते.

जुनेद शेख यावेळी म्हणाले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना युवकांनी मिळालेल्या पदाचा उपयोग तळागाळातील वंचितांच्या सेवेसाठी करावा. युवाशक्तीने विकासासाठी एका जोमाने काम केल्यास अनेक प्रश्‍न सुटणार आहेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget