History of Maharashtra

नगर महापालिका स्वबळावर लढणार : भाजपचा निर्णय

महापौर भाजपाचा करण्याचा ठराव


अहमदनगर । DNA Live24 - मिरा-भाईंदर महापालिकेत भाजपाने मुसंडी मारुन मिळविलेल्या स्पष्ट बहुमताबद्दल नगर शहर भारतीय जनता पार्टीच्यावतीने लक्ष्मीकारंजा चौकात फटाके वाजवून आनंदोत्सव साजरा केला. तत्पुर्वी भाजपा कार्यालयात झालेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठक झाली. या बैठकीमध्ये शहर जिल्हा सरचिटणीस किशोर बोरा यांनी नगरची आगामी महानगरपालिका स्वबळावर लढून महापौर भाजपाचा करण्याचा ठराव मांडला. त्यास उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी अनुमोदन दिले. 

यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकमताने हा ठराव संमत केला. यावेळी ज्येष्ठ नेते सुनिल रामदासी, उपाध्यक्ष अन्वर खान, नगरसेविका मालन ढोणे, गटनेते सुवेंद्र गांधी, मध्यनगर सरचिटणीस प्रशांत मुथा आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी सुनिल रामदासी म्हणाले, पूर्वी अत्यंत दुर्मिळ प्रसंगी आनंदोत्सव साजरा करण्याची संधी मिळत असे. आता सातत्याने भाजपा कार्यालयात आनंदोत्सव साजरा करण्याची संधी भाजपाच्या कार्यकर्त्यांना मिळत आहे. विकासाच्या मुद्यावर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रात निवडणुका लढवत असून, उत्कृष्ट नियोजनामुळे जिंकतही आहे. या यशामध्ये प्रदेश पदाधिका-यांन इतकेच पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांचे योगदान आहे. भारतीय जनता पार्टी संपूर्ण राज्यात मिळवत असलेल्या यशामुळे, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे. नगरची महापालिकाही जिंकायची आहे. त्यासाठी पक्षाने दिलेला अजेंडा तंतोतंत अंमलात आणवयाचा आहे..

उपमहापौर छिंदम म्हणाले, 25 वर्षे शिवसेना आमदार नगरमध्ये होते. तसेच गेल्या तीन वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. महापालिकेतही या आधी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस पक्षांना महापौरपद मिळाले. मात्र आजपर्यंत भाजप या पदांपासून लांब आहे. आता मात्र भाजपला नगर शहरामधील सर्व निवडणुका जिंकण्याची मोठी संधी आली आहे.  जेव्हा जेव्हा भाजप स्वबळावर लढतो, तेव्हा तेव्हा भाजपाने मोठे यश संपादन केले आहे. त्याचीच पुनवृत्ती नगरमध्ये करावयाची आहे. यासाठी 2018 ला आपल्याला नगरच्या महापालिकेला सामोरे जायचे आहे. ही निवडणुक आपण स्वबळावर लढणार आहोत. यासाठी नियोजन करत आहोत.

किशोर बोरा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदनपार भाषण केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक अन्वर खान यांनी केले तर आभार नरेश चव्हाण यांनी मानले.  यावेळी विश्‍वनाथ पोंदे, मल्हार गंधे, शाकीर सय्यद, बाळासाहेब भोरे, सुभाष साळवे, अज्जू शेख, संतोष शिरसाठ, अविनाश साखला, रफिक सय्यद, सागर कराळे, उमेश साठे, सागर गोरे, तुषार पोटे, नितीन घोरपडे, संदिप पवार, सुनिल सकट, जालिदर शिंदे, शुभम कोटा, शशिकांत पालवे, विपुल पुप्पाल, हेमंत दंडवते, शिवाजी दहिंडे, गणेश साठे आदिं कार्यकर्ते उपस्थित होते.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget