728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मराठा मोर्चाच्या मागण्यांच निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त


मुंबई । DNA Live24 - मराठा आंदोलकांच्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द करण्यात आलं. सरकारच्या उत्तराशिवाय मैदान सोडणार नसल्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

एक मराठा, लाख मराठा म्हणत आज राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाने क्रांती मोर्चाच्या माध्यमातून एल्गार पुकारला आणि आपल्या मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना सुपूर्द केलं. आज सकाळी 11 वाजता भायखळ्याच्या वीर जिजामाता उद्यानापासून सुरु झालेला मोर्चा दोन तासात शिस्तबद्धपणे आझाद मैदानात दाखल झाला.

[ads-post]

आझाद मैदानात पोहोचल्यानंतर या मोर्चातल्या तरुणींनी आपल्या मनातला आक्रोश उपस्थित जनसागरासमोर मांडला. सहा मुलींच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निवेदन सुपूर्द केलं आहे.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मराठा मोर्चाच्या मागण्यांच निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त Rating: 5 Reviewed By: DNA Live24