History of Maharashtra

नगरच्या महापालिकेसाठी वर्षभरात कोणता निधी आणला? : आ. संग्राम जगतापांचा शिवसेनेला सवाल

यापुर्वी नगर शहराच्या निवडणुका फक्त जातीवादावर लढविल्या गेल्या. विकासाचा मुदयावर कधीच निवडणूक झाली नाही.


अहमदनगर । DNA Live24 - अहमदनगरच्या महापालिकेत सत्ताबदल होऊन एक वर्ष झाले. केंद्रात व राज्यात सत्ताधारी असताना वर्षभरात नगरच्या महानगरपालिकेसाठी असा कोणता निधी आणला? असा संतप्त सवाल आमदार संग्राम जगताप यांनी सत्ताधारी शिवसेनेला नाव न घेता केला आहे.

प्रभाग क्रमांक 19 मध्ये नगरसेविका ख्वाजाबी कुरेशी यांच्या प्रयत्नातून रामचंद्र खुंट ते जिल्हाधिकारी कार्यालय बंद पाईपलाईन गटार व रस्ता डांबरीकरण कामाचा शुभांरभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रंसगी माजी आमदार दादाभाऊ कळमकर, नगरसेवक संपत बारस्कर, फैय्याज केबलवाले, शौकत तांबोळी , मुजाइद खुरेशी, संजय घुले, अविनाश घुले, मन्सुर शेख, उबेद शेख, साहेबान जागीरदार, हाजी मुस्ताक खुरेशी, वाहिद खुरेशी, अमित खामकर, मुन्नाशेठ चमडेवाले, सय्यद अक्तरअली, दादू सुभेदार, मुक्तार अहमद खुरेशी, असलम बागवान, निसार बागवान, हरुनभाई खुरेशी, अनुप खंडेलवाल, अनिल लुंकड, गयाज खुरेशी, निसार बागवान, सय्यद इरफान, जिया खाजा, हबीब बागवान, शोयब खान, सय्यद मुन्ना, शिवा काळभोर, राम पठारे, इसाक बापू , असगर मामू, सलीम रेडियमवाला, कद्दस बागवान, अलतमश जरीवाला  उपस्थित होते.

यावेळी आमदार जगताप म्हणाले की, यापुर्वी नगर शहराच्या निवडणुका फक्त जातीवादावर लढविल्या गेल्या. विकासाचा मुदयावर कधीच निवडणूक झाली नाही. त्यामुळे नगर शहर विकासापासून वंचित राहिले. नागरीकांच्या माध्यमातून मला महापौर पदाची असो की आमदार पदाची संधी मिळाली त्या माध्यमातून आम्ही फक्त आणि फक्त हया शहराच्या विकासासाठीच मोठया प्रमाणात निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले. केंद्र किंवा राज्य शासनाचा निधी असो, आम्ही महापालिकेत मोठा निधी उपलब्ध केल्याने 40 टक्के विकासाचा गाडा ओढण्यात यशस्वी झालो.


काही विघ्नसंतोषी लोकांमुळे आपल्या भागातील सुख-शांती भंग होऊ नये हे पाहण्याची गरज आहे. नगर शहर शांत कसे राहिल ! उदयोग व्यवसाय कसे नांदतील ! सर्व लोक सुखानी कसे नांदतील, याची खबरदारी घेण्याची गरज आहे. विकासाच्या बाबतीत आम्ही सर्व भागामध्ये प्रयत्नशील आहोत. महानगरपालिका आज राष्ट्रवादीच्या ताब्यात नाही. यावेळेला राष्ट्रवादीची सत्ता होती त्यावेळी राष्ट्रवादीने मोठया प्रमाणावर विकास निधी आणून विकासाची कामे केलेली आहेत.

जे मंडळी आधी सांगायचे की आमची सत्ता दिल्ली मध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे. यावेळी आमची सत्ता अहमदनगर महानगर पालिकेवर येईल त्यावेळी आम्ही खुप मोठा निधी आणू, अशा प्रकारच्या वल्गना करायची. आज त्या लोकांनी कुठला मोठा निधी त्यांनी महापालिकेसाठी आणला ? हे जाहिर करावे त्यांनी कुठलाही निधी आणला नाही.  त्यामुळे ते जाहिर ही करु शकत नाही. नागरिकांचे मुख्य प्रश्‍न मोकाट जनावरे, मोकाट कुत्री, कचरा कुंडीचा, आरोग्याचे प्रश्‍न महापालिकेकडून सोडवले जात नाहीत. त्याची अपेक्षा आपण कोणाकडून करायच,  असा प्रश्‍न नागरिकांमध्ये निर्माण झालेला आहे.

आमदार निधी काय ते भैय्यांनी दाखविले - आमच्या भागात आमदार निधी काय असतो हे संग्राम जगताप यांच्या माध्यमातून आम्हांला समजले असे मनोगत शौकत तांबोळी यांनी व्यक्त केले. 
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget