728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

Live Updates : मुंबईत मराठा मोर्चाचा एल्गार !


मुंबई । DNA Live24 - 

३.३० ------------
मराठा मोर्चाच्या मागण्यांच निवेदन मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्त
-----------

1:51 - आझाद मैदानावर मराठा समाजाच्या तरुणींची निवेदने सुरू

1:40 - माेर्चेकऱ्यांनी भाजप अध्यक्ष अाशिष शेलारांना विधानसभेत जा, असे सुनावले 

1:35 - मराठा क्रांती मोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण आणि आमदार भाई जगताप सहभागी झाले

1:30 - मराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री करणार महत्वपूर्ण घोषणा - रावसाहेब दानवे

1:25 -  मुंबईतील मोर्चा समारोपाचा समजू नये, ही सुरुवात आहे : निलेश राणे

1:10 - मराठा आरक्षण, कोपर्डी बलात्कार प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा, अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा अशा विविध मागण्यांसाठी आतापर्यंत राज्यभरात 57 माेर्चे निघाले असून मुंबईतील हा 58 वा मोर्चा आहे.

1:05 - मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक विधानभवनातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

1 :00 -  मोर्च कसे असावे, हे महाराष्ट्रातील मराठा मोर्चाने जगाला दाखवले - छत्रपती संभाजीराजे


12:35 - मुंबईतील जेजे फ्लायओव्हर वाहतुकीसाठी बंद, फक्त मोर्चेकऱ्यांना इथून जाण्याची परवानगी

12 :30 - विनायक मेटेंना चले जावच्या घोषणा देऊन हाकलून लावले.

12 :15 - छत्रपती संभाजीराजे मराठा मोर्चात सहभागी


12:05 -  मोर्चात सहभागी होण्यासाठी विरोधक विधानभवनातून आझाद मैदानाच्या दिशेने रवाना

11:22 - विधानसभेत चंद्रकांत पाटील मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडणार

11:20 - विधानभवाच्या पायरीवर शिवसेनेचे आमदार मराठा मोर्चाच्या पाठिंब्यासाठी एकत्र, घोषणाबाजी सुरु

11:15 - जिजामाता उद्यानाजवळील मराठा क्रांती मोर्चाचं शिवसेनेचं पोस्टर मोर्चेकऱ्यांनी फाडलं, मोर्चात राजकारण नको म्हणून केवळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं पोस्टर ठेवत इतर पोस्टर फाडून टाकण्यात आलं.

11:12 - भाजप नेते आशिष शेलार यांना धक्काबुक्की, शेलार यांना आझाद मैदानात येण्यास मराठा कार्यकर्त्यांकडून मज्जाव, मात्र धक्काबुक्की झाल्याच्या वृत्ताचा शेलारांकडून इन्कार

11:10 - भाजप - राष्ट्रवादीच्या आमदारांचे विधान भवनाबाहेर निदर्शने सुरु.

11:05 - मराठा क्रांती मोर्चा आझाद मैदानाकडे रवाना.

क्रांतीदिनाचं औचित्य साधून आज राजधानी मुंबईत मराठा आरक्षणासाठी आवाज घुमत आहे. यानिमित्ताने आयोजित केलेल्या महामोर्चासाठी लाखो मराठा बांधव भायखळ्याच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज सकाळी 11 वाजता राज्यभरातून आलेले मराठा बांधव भायखळ्याच्या राणीच्या बागेजवळ जमतील आणि तिथून आझाद मैदानाकडे कूच करणार आहेत.

नवी मुंबईतील सर्व पार्किंग ग्राऊंड जवळपास फुल्ल, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या गाड्या पार्क करण्यात आल्या आहेत.

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना झाले आहेत.

मुंबईकडे येणाऱ्या सर्व हायवेवरील टोलनाक्यांवर टोलवसुली बंद आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबईकडे येणाऱ्या नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका इथे टोलवसुली बंद आहे.

मोर्चाच्या गर्दीने पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, आनंदनगर जकातनाक्यापासून मुंबईकडे येणारी वाहतूक अत्यंत धीम्यागतीने, तीनहात नाका, कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळंबली आहे.

मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चात शिवसेनेचे मंत्री आणि आमदार सहभागी होणार असल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. यापूर्वी जिल्हा स्तरावर झालेल्या मोर्चांमध्येही शिवसेनेचे स्थानिक नेते आणि मंत्री सहभागी झाले होते. आता मुंबईतल्या मोर्चामध्येही शिवसेनेच्या मंत्र्यांची हजेरी राहणार आहेत.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: Live Updates : मुंबईत मराठा मोर्चाचा एल्गार ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24