History of Maharashtra

नगर जिल्हा परिषद वाटणार ५ हजार सायकल

बिल सादर केल्यानंतर त्याच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे


अहमदनगर । DNA Live24 - राज्य सरकारच्या आदेशानूसार आता वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये लाभार्थ्यांना आधी साहित्याची खरेदी करावी लागत आहेत. खरेदी झाल्यानंतर संबंधीत साहित्याचे बिल सादर केल्यानंतर त्याच्या खात्यावर अनुदान वर्ग होणार आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाने यंदा २ कोटी १० लाख रुपयांतून ५ हजार १९४ सायकल देण्याचा निर्णय घेतला आहे.

यंदा समाज कल्याण विभागाने लेडीज सायकल आणि पुरूषाच्या सायकलसाठी २ कोटी १० लाख रुपायांची तरतूद केली आहे. यात २ हजार ७५० लेडीज सायकल आणि २ हजार ४४४ पुरुषांच्या सायकलींचे उद्दीष्ट ठेवण्यात आलेले आहे. एका लेडीज सायकलची किंमत ४ हजार निश्‍चित करण्यात आली असून पुरूषांच्या सायकलची किंमत ४ हजार ५०० रुपये निश्‍चित करण्यात आली आहे. यानूसार तालुकानिहाय उद्दिष्ट ठरवण्यात आले असून लाभार्थ्यांच्या यादीला समाज कल्याण समितीच्या बैठकीत मंजूरी घेतल्यानंतर तालुक्याला याद्या पाठवण्यात येणार आहेत.

त्या ठिकाणी मंजूर यादीतील लाभार्थ्याला आधी सायकल विकत घ्यावी लागणार असून त्यानंतर त्याचे बिल पंचायत समिती पातळीवर सादर करावे लागणार आहे. त्यानंतर समाज कल्याण विभाग लाभार्थ्याने सायकल खरेदी केली की नाही याची खात्रिकरणा असून त्यानंतर तालुकानिहाय लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हास्तरावर येवून त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर निधी वर्ग करण्यात येणार आहे.

कोणत्या तालुक्याच्या वाट्याला किती सायकल - अकोले २१० लेडीज, १९५ पुरूष. संगमनरे ३१० लेडीज, २९५ पुरूष. कोपरगाव १२५ लेडीज, १२० पुरूष. राहाता २२५ लेडीज, २२० पुरूष. श्रीरामपुर १२५ लेडीज, १२० पुरूष. नेवासा २२५ लेडीज, २१५ पुरूष. शेवगाव १८५ लेडीज, १७० पुरूष. पाथर्डी १३५ लेडीज, १२५ पुरूष. नगर १९० लेडीज, १५० पुरूष. राहुरी १३५ लेडीज, १२५ पुरूष. पारनेर १३५ लेडीज, १२५ पुरूष. श्रीगोंदा १९५ लेडीज, १७५ पुरूष. जामखेड ५० लेडीज, ५० पुरूष आणि कर्जत ५०५  लेडीज, ३४९ पुरूष.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget