History of Maharashtra

महाराष्ट्रातील ५६ पोलिसांना राष्ट्रीय पोलीस पदके

देशातील ९९० पोलीस अधिकारी –कर्मचा-यांना महत्वपूर्ण योगदानासाठी विविध श्रेणीत पोलीस पदाकांची घोषणा करण्यात आली.


नवी दिल्ली । DNA Live24 - पोलीस सेवेतील उल्लेखनीय सेवेसाठी आज महाराष्ट्रातील ५६ अधिकारी- कर्मचा-यांना राष्ट्रीय पोलीस पदके जाहीर झालेत. १२ पोलिसांना पोलीस विरता पदक, ३ पोलिसांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक आणि ४१ पोलिसांना उल्लेखनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले.

स्वातंत्र्य दिनाच्या पूर्व संध्येला देशातील ९९० पोलीस अधिकारी –कर्मचा-यांना महत्वपूर्ण योगदानासाठी विविध श्रेणीत पोलीस पदाकांची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रातील ५६  पोलीस अधिकारी –कर्मचा-यांचा यात समावेश आहे. देशातील २० तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेसाठी सुधारक पदक जाहीर  झाले यात महाराष्ट्रातील  २ अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे.

राज्यातील १२ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस विरता पदक
 राज्यातील १२ पोलीस अधिका-यांना पोलीस विरता पदक जाहीर झाले असून त्यांची नावे खालील प्रमाणे.
१) एम. राजकुमार, अतिरीक्त पोलीस अधिकक्षक
२) दत्तात्रय काळे, पोलीस उपनिरीक्षक
३) नितीन माने, सहायक पोलीस निरीक्षक.
४) प्रफुल्ल कदम, पोलीस उपनिरीक्षक.      
५) विजय रत्नपारखी पोली उपनिरीक्षक.
६) प्रमोद भिंगारे पोलीस उपनिरीक्षक
७) मल्लेश केदमवार, हेड कॉन्सटेबल.
८) मोतीराम मडावी, हेड कॉन्सटेबल.
९) गजेंद्र सौंजाळ, कॉन्सटेबल.
१०) जितेंद्र मारगाये, नाईक.
११) स्वर्गीय डोगे आत्राम, नाईक (मरणोत्तर).
१२) स्वर्गीय स्वरूप अमृतकर, कॉन्सटेबल(मरणोत्तर).

३ अधिका-यांना राष्ट्रपती पोलीस पदक
राज्यातील ३ पोलीस अधिका-यांना विशीष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१) दिनेश अहीर, सहायक पोलीस आयुक्त दहशतवाद विरोधी पथक, नागपाडा, मुंबई
२) मुजफ्फ सईद, सहायक पोलीस उपनिरीक्षक, विशेष शाखा, नाशिक शहर.
३) सुरेंद्रनाथ आवळे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, सांगली.

४१ अधिकारी –कर्मचा-यांना पोलीस पदक 
राज्यातील ४१  अधिकारी-कर्मचा-यांना प्रशंसनीय सेवेसाठी पोलीस पदक जाहीर झाले आहे, त्यांची नावे पुढील प्रमाणे.

१)  के.एम.मल्लीकार्जुन प्रसन्ना,अतिरीक्त आयुक्त (गुन्हे), मुंबई पोलीस आयुक्त कार्यालय.
२) प्रतापसिंह पाटणकर , विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर.
३) केशव पाटील, पोलीस उपमहानिरीक्षक, भ्रष्टार विरोधी दल, वरळी, मुंबई.
४) अंकुश शिंदे , अतिरीक्त पोलीस आयुक्त, नागपूर शहर, नागपूर.
५) बाळश्रीराम गायकर, पोलीस उपायुक्त, शिवाजी नगर, पुणे शहर, पुणे.
६) प्रभाकर बुधावंत, पोलीस अधिक्षक, पुणे.
७) अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त, मुंबई.
८) महेश घु-हे, कमांडट, राज्य राखीव पोलीस दल, जोगेश्वरी मुंबई.
९) दिलीप सावंत, पोलीस उपायुक्त (गुन्हे शाखा), सीआयडी मुंबई.
१०)  राजेंद्र डहाले, पोलीस अधिक्षक , नंदुरबार.
११) निसार तांबोळी, कमांडट, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप १४, औरंगाबाद.
१२) अनिल आकडे, पोलीस उपअधिक्षक, उपविभागीय पोलीस कार्यालय, वसई, ठाणे
१३) नागनाथ कोडे, सहायक पोलीस आयुक्त छावणी क्षेत्र, औरगांबाद शहर, औरंगाबाद.
१४) जयराम मोरे, सहायक पोलीस आयुक्त, विक्रोळी विभाग, मुंबई.
१५) सर्जेराव पाटील, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे, पुणे ग्रामीण.
१६) सुधिर कालेकर, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा -१, मुंबई .
१७) विनायक वस्त, पोलीस निरीक्षक, डीसीबी, सीआयडी, एन्टी एक्स्टॉर्शन सेल, मुंबई शहर.
१८)सुभाष सावंत , पोलीस निरीक्षक, दहीसर पोलीस ठाणे, मुंबई.
१९) विवेक मुगलीकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पिंपरी पोलीस ठाणे, पुणे शहर, पुणे.
२०) मधुकर काड, पोलीस निरीक्षक, भद्रकाली पोलीस ठाणे , नाशिक शहर, नाशिक.
२१) बजरंग कापसे, सहायक पोलीस निरीक्षक, सांगोला पोलीस ठाणे, सोलापूर.
२२) प्रकाश पोतदार, पोलीस उपनिरीक्षक, सिंधखेडा पोलीस ठाणे, धुळे.
२३) विजय टक्के, पोलीस उपनिरीक्षक, एसआयडी, मुंबई.
२४) रामचंद्र कानडे, पोलीस उपनिरीक्षक, डिसीबी, सीयाडी युनीट १२, दहीसर, मुंबई.
२५) दिलीप माळी, पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, धुळे.
२६) सुनिल चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप १०, सोलापूर.
२७) राजकुमार माने, सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुख्यालय, शिवाजी नगर पुणे.
२८) कैलाश मोहोळ, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सिंहगड पोलीस ठाणे, पुणे शहर, पुणे.
२९) प्रकाश नाईक, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप १, पुणे.
३०) रौफ शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूर.
३१) मौजोद्दीन शेख, सहायक पोलीस उपनिरीक्षक, भ्रष्टाचार विरोधी दल, जळगाव.
३२) सदाशिव शिंदे, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप-२ पुणे.
३३) मदन गिते, सहायक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस प्रशिक्षण केंद्र , जालना.
३४) लक्ष्मण गायकवाड, सहायक पोलीस उपनिरीक्षक, डिसीबी , सीआडी, युनीट-४, मुंबई शहर, मुंबई.
३५) सुरेश जगताप, सहायक पोलीस उपनिरीक्षक, विश्रामबाग पोलीस ठाणे, पुणे शहर, पुणे.
३६) नंदकिशोर परदेशी, सहायक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल, ग्रुप-३, जालना.
३७) चंद्रकांत रगतवान, सहायक पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा, पुणे शहर पुणे.
३८) धनराज चव्हाण, हेड कॉन्सटेबल, पोलीस अधिक्षक कार्यालय, जळगाव.
३९)  रघुनाथ फुके, इन्टेलिजन्स ऑफीसर, एसआयडी, औरंगाबाद.
४०) राम बागम, पोलीस हेड कॉन्सटेबल, गुन्हे शाखा, डीसीबी सीआयडी, मुंबई.
४१) प्रकाश लांघे, हेड कॉन्सटेबल, कोरेगाव पार्क पोलीस ठाणे, पुणे शहर, पुणे.

२ तुरुंग अधिकारी -कर्मचा-यांना सुधारक सेवा पदक 
देशातील २० तुरुंग अधिकारी-कर्मचा-यांना उत्कृष्ट सेवेसाठी सुधारक पदक जाहीर  झाले आहे. पुण्यातील येरवडा तुरुंगाचे तुरुंगाधिकारी प्रकाश उकरंडे आणि कोल्हापूर सेंट्रल जेलचे हवालदार रमेश धुमाळ यांना  यांना आज राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget