History of Maharashtra

नरेंद्र मोदी खासगी कंपन्यांचे प्रचार मंत्री - कन्हैय्याकुमार

पीएम नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानींसारख्या खासगी कंपन्यांचे प्रसार-प्रचारमंत्री आहेत, असा आरोप जेएनयुचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार यांनी केला.


अहमदनगर । DNA Live24 - पीएम नरेंद्र मोदी हे अंबानी, अदानींसारख्या खासगी कंपन्यांचे प्रसार-प्रचारमंत्री आहेत, असा आरोप जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैय्याकुमार याने केला. देशात वाढती बेकारी, शिक्षणाचे बाजारीकरण होत आहे. धार्मिक व जातीय हिंसाचार, शेतकरी आत्महत्यांसारखे प्रश्न वाढत आहेत. महात्मा गांधीजींच्या हत्येत ज्यांचा सहभाग होता, त्यांच्याकडून गांधीवादाची काय अपेक्षा करायची, असा सवालही त्याने उपस्थित केला.

ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन व ऑल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने आयोजित केलेला लाँग मार्च रविवारी नगरमध्ये आला. त्यावेळी औरंगाबाद रस्त्यावरील सिटी लॉनमध्ये आयोजित सभेत कन्हैय्याकुमार बाेलत होता. कन्याकुमारीपासून सुरू झालेला लाँग मार्च 'सेव्ह इंडिया, चेंज इंडिया' हे ब्रीदवाक्य घेऊन निघाला आहे. देश स्वतंत्र होऊनही आपल्या मूळ समस्या तशाच आहेत. जीएसटीसारखा एक कर असलेला कायदा अस्तित्वात येतो. पण, देशात शिक्षणासाठी, दळवळणासाठी एक यंत्रणा सरकारला आणता येत नाही, हे दुर्दैव आहे, असे कन्हैय्याकुमार म्हणाला.

निवडणुका या आंदोलनाचाच एक भाग असतात. आम्ही आंदोलक आहोत, निवडणुका लढू किंवा नाही, पण आमचे आंदोलन अखेरपर्यंत सुरूच राहिल. सध्याचे सरकार देशात एक प्रकारची संस्कृती थोपवण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संस्कृतीला धार्मिकतेचा आधार घेऊन चुकीचा इतिहास जनतेवर थोपवायचा आहे, त्यामुळे त्याला विरोध करण्याचे काम आम्ही करत राहू, असा निर्धार त्याने व्यक्त केला. राहुल गांधींवर झालेला हल्ला नवीन बाब नाही. लोकांचा आवाज दडपण्याासाठी यापूर्वीही जमावाने हल्ले केले असल्याचेही त्याने नमूद केले.


महाराष्ट्रात पुरोगामी विचारसरणीच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्या झाल्या. अजूनही सरकारला त्यांचे मारेकरी सापडलेले नाहीत. सरकारमध्ये अशा मारेकऱ्यांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे पाठीशी घालणाऱ्या प्रवृत्ती बसलेल्या आहेत. त्यामुळे विचारवंतांचे मारेकरी सापडतील की नाही, ही शंकाच आहे. आपल्यावर दहशतवादी असल्याचा आरोप झाला, क्रांतीकारक भगतसिंगांवरही असेच आरोप झाले होते. आपली लढाई न्यायासाठी, सत्यासाठी असून ती शेवटपर्यंत सुरूच राहिल, असेही त्याने स्पष्ट केले.

यावेळी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे अध्यक्ष रामदास वाघस्कर, क्रांतीसिंह नाना पाटील कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष बहिरनाथ वाकळे, बन्सी सातपुते, कॉम्रेड अनंत लोखंडे, आदी उपस्थित होते. कन्हैय्याकुमारची सभा ऐकण्यासाठी युवकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. अर्शद शेख यांनी प्रास्ताविक केले. सागर दोंदे यांनी स्फुर्तीगीते सादर केली. सभेला आधी झालेला विरोध लक्षात घेता पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलेला होता. मात्र, सभा कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget