728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

'कॉंग्रेस'च्या सत्यजित तांबेंचे 'उड्डाण' कुणीकडे...?


अहमदनगर । DNA Live24 विशेष नगरच्या बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाच्या कामासाठी प्रदेश युवक कॉंग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची भेट घेतली. नगरचा उड्डाणपूल करणे मोठमोठ्या राजकीय धुरिणांचे स्वप्न असताना तांबे यांनी या प्रश्नात लक्ष घालत थेट गडकरींची भेट घेतल्याने, कॉंग्रेसच्या सत्यजित तांबेंचे 'उड्डाण' नेमके कुणीकडे...? असा सवाल आश्चर्याने उपस्थित होत आहे.

नगर शहरातील नागरीकांच्या अत्यंत जिव्हाळ्यााचा असलेला परंतु अनेक दिवसांपासून रखडलेला उड्डानपूल व बाह्यवळण रस्त्याच्या कामासंदर्भात महाराष्ट्र युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेवून हे काम तातडीने मार्गी लावण्याची विनंती नुकतीच केली.

अ. नगर शहरातील उड्डान पूल व बाह्यवळण रस्त्यांचे काम अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. हे काम तातडीने पुर्ण व्हावे ही शहरातील नागरीकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे. या उड्डानपूल व बाह्यवळण रस्त्यामुळे शहरात वाढलेली गर्दी, ट्रॉफिक समस्या, प्र्रदुषन व वाढलेले अपघाताचे प्रमाण कमी होणार आहे. आतापर्यंत या उड्डाणपुलाच्या कामाबद्दल 'ब्र'ही न काढणाऱ्या सत्यजित तांबे यांना नेमकी आत्ताच या प्रश्नाची आठवण कशी झाली? याबाबतही चर्चा झडू लागल्या आहेत.

त्याला कारणही तसेच. मागील विधानसभेला शहरातून आमदारकीच्या माध्यमातून शहराचे प्रतिनिधित्व करण्याचे तांबे यांचे स्वप्न भंगले. एकतर नवीन चेहरा आणि त्यात प्रचाराचा 'भपकेपणा' नगरकरांना भावला नाही. त्यावेळी त्यांनी केलेली घोषणा म्हणजे 'येथून पुढील राजकारण नगर शहरातच.' मात्र निवडणुकीत सपाटून पडल्यावर त्यांनी शहराकडे 'पाठ'च फिरविली होती.

बाळासाहेब थोरात आमदार असल्याने संगमनेरातून सत्यजित तांबे यांना अजून दोन 'टर्म' तरी संधी नाही. त्यामुळे नगरशिवाय त्यांच्याकडे 'पर्याय' नाही. भविष्य वर्तविण्यात 'एक्स्पर्ट' असलेल्या तांबे यांनी अनेकांचे भविष्य 'ट्वीट' केले आहे. दुसर्यांकडे एक बोट दाखवितांना हाताची चार बोटे मात्र स्वतःकडे निर्देश करत असल्याचे त्यांच्या बहुतेक लक्षातच येत नसावे.

अप्रत्यक्षरीत्या विखेंचा भाजप प्रवेश दाखवितांना प्रत्यक्षात भाजपच्या मित्रपक्षासोबत वाढत असलेली तांबे यांची 'जवळीक' याठिकाणी 'नोंद' घेण्याजोगी आहे. विखे भाजपात जाण्याचे निश्चित झाल्यास नगर शहरातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणावर बदलणार आहेत. विखे लोकसभेला भाजपात गेल्यास खा. गांधी यांचे काय होणार असा अनेकांना प्रश्न आहे. त्यामुळे 'छोट्या' खासदारांना शहरातून आमदारकीसाठी त्यांचा प्रयत्न राहणार आहे. कॉंग्रेसच्या तिकिटावर खुद्द राहुल गांधी जरी नगरमधून उभे राहिले तरी ते निवडून येतीलच याची कोणीच शाश्वती घेऊ शकत नाही. त्यामुळे तांबे नव्या पर्यायाच्या शोधात असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

हा नवीन 'पर्याय' कोणता असू शकतो? याबाबत अनेक 'तर्क-वितर्क' असले तरी, तांबे यांचे 'उड्डाण' त्यांच्या सध्याच्या पक्षात 'चवीने' चर्चिले जात आहे. कॉंग्रेसचे कट्टर (?) कार्यकर्तेही द्विधा मनःस्थितीत असून, तांबेंच्या भूमिकेकडे 'बारीक' लक्ष ठेवण्यात येत आहे. जुन्या कार्यकर्त्यांनी यामुळेच 'ताकही फुंकून पिण्याचा' कार्यक्रम सुरु केल्याने शंकेला वाव मिळत असून, विधानसभेला शहरातील राजकारण 'नाट्यमय'रित्या बदललेले पहावयास मिळणार आहे.

जसजशी लोकसभा, विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे तसतशी चर्चा वाढत जाणार आहे. कोण कोणाच्या 'कळपात' सामील होणार याबाबत उत्सुकता असून, 'बाणा'वर 'हात' कोणाचा राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: 'कॉंग्रेस'च्या सत्यजित तांबेंचे 'उड्डाण' कुणीकडे...? Rating: 5 Reviewed By: DNA Live24