History of Maharashtra

पत्नीवर अॅसिडहल्ला करणारा पती गजाआड

पत्नीवर अॅसिड टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आहे.


अहमदनगर । DNA Live24 - मुलांना शाळेतून आणायला निघालेली पत्नी एका शिक्षकासोबत जाताना बघून तिच्या पतीचा राग अनावर झाला. त्याने पत्नीवर अॅसिड टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याच्या हद्दीत यशवंतनगर परिसरातील डेअरी फार्मजवळ घडला. पोलिसांनी वेगाने तपास करुन हल्लेखोर पतीला ताब्यात घेतले आहे.

पीडित पत्नीच्या फिर्यादीवरुन कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. महिला मुलांना शाळेतून आणण्यासाठी निघाली होती. रस्त्यात शाळेतील शिक्षक भेटले. ते ओळखीचे असल्याने महिला त्यांच्या गाडीवर बसून निघाली. पुढे गेल्यानंतर तिच्या पतीने दोघांना पाहिले. पत्नीला दुसऱ्यासोबत पाहून त्याचा राग अनावर झाला. त्याने पत्नीवर अॅसिड टाकून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. लगेचच तो तेथून फरार झाला.

भिंगार कॅम्प पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास देशमाने व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. महिलेला तत्काळ दवाखान्यात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दवाखान्यात तिने दिलेल्या जबाबावरुन पोलिसांनी तिच्या पतीविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवला. सहायक निरीक्षक देशमाने यांच्यासह फौजदार संजय कवडे, सहायक फौजदार राजेंद्र गायकवाड, पोलिस नाईक राजू सुद्रिक, ज्ञानेश्वर शिंदे, राहुल द्वारके, यांनी तपास सुरू केला.

फरार पती डेअरी फार्म परिसरातील काटवनात लपला होता. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन पकडले. ज्या बाटलीतून त्याने पत्नीवर अॅसिड टाकले, ती त्याने पोलिसांच्या हवाली केली. या गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय कवडे हे करीत आहेत.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget