History of Maharashtra

'चंकी पांडे'ची कन्या येणार 'बॉलीवूड'मध्ये !

तिचे सौंदर्य आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्स यामुळे तिचे नाव आधीच ‘फॅशन दिवा’च्या लिस्टमध्ये गेले आहे


मुंबई । DNA Live24 - सध्या बॉलीवूडमध्ये स्टारपुत्र-कन्यांच्या पदार्पणाचे पेव फुटले आहे. जान्हवी कपूर, सारा अली खान यांच्यासह शाहिदचा भाऊ इशान, सुनील शेट्टीचा मुलगा व अन्य अनेकजण पदार्पणासाठी सज्ज होत आहेत. या मांदियाळीत चंकी पांडेची कन्या अनन्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. अनन्या नुकतीच ग्रॅज्युएट झाली असून, तिचे सौंदर्य आणि जबरदस्त ड्रेसिंग सेन्स यामुळे तिचे नाव आधीच ‘फॅशन दिवा’च्या लिस्टमध्ये गेले आहे. ती लवकरच बॉलीवूड पदार्पण करू शकते, असे म्हटले जाते.

तिचे फोटो पाहून अलीकडेच फराह खानने ‘चंकी पांडेची कन्या आणि इतकी सुंदर? तिने आपली डीएनए टेस्ट करायला पाहिजे’ असे गंमतीने म्हटले होते! खरे तर तिचा चेहरा बराचसा आपल्या पित्यासारखाच आहे.

चंकीने हिरो म्हणून अनेक चित्रपट केले होते. मात्र, हिरोपेक्षाही त्याचे ‘तेजाब’ किंवा ‘आँखे’सारखे अन्य हिरोंसमवेतचे चित्रपटच अधिक लक्षात राहिले. त्याला आपल्या करिअरमध्ये जितकी प्रसिद्धी मिळाली त्यापेक्षाही अधिक प्रसिद्धी चित्रपटात न येताच त्याच्या कन्येला मिळत आहे.

शाहरूख खानची कन्या सुहाना आणि संजय कपूरची कन्या शान्या यांच्याशी तिची खास मैत्री आहे. या तिघींचे एकत्र फोटो नेहमी सोशल मीडियात येत असतात. ती करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इअर-2’ मधून पदार्पण करील अशी चर्चा होती, पण याबाबत अधिकृत माहिती पुढे आली नाही !

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget