History of Maharashtra

भिंगार पोलिसांनी उचलला गोवंशीय जनावरांचा खर्च

बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेली जनावरे भिंगार पोलिसांनी ताब्यात घेऊन गोशाळेत दाखल केली. सहा गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे.


अहमदनगर । DNA Live24 - बेकायदेशीर कत्तल करण्यासाठी घेऊन जात असलेली जनावरे भिंगार पोलिसांनी ताब्यात घेऊन गोशाळेत दाखल केली. सहा गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पोचालक व क्लीनरला ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियमानुसार गुन्हा नोंदवला. केवळ गुन्हा नोंदवून कायदेशीर कर्तव्य पार न पाडता भूतदया जपत सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे व भिंगार पोलिसांनी स्वखर्चातून जनावरे गोशाळेत दाखल केली.

पुण्याहून नगरमार्गे जेऊरच्या दिशेने गोवंशीय जनावरे असलेला टेम्पो जात असल्याची माहिती सहायक पोलिस अधीक्षक शिंदे यांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक अधीक्षक शिंदे यांनी भिंगार पोलिसांना सूचना केल्या. त्यानुसार सहायक फौजदार गायकवाड, पोलिस नाईक राजू सुद्रिक, तान्हाजी पवार, क्षीरसागर आदींच्या पथकाने नगर पुणे रस्त्यावर एसबीआय चौकात सापळा रचला.

पिकअप (क्र. एमएच १६ एवाय ३०७५) पुण्याहून औरंगाबादच्या दिशेने आले असता पोलिसांनी ते अडवले. त्यामध्ये सहा जर्शी गाया, सहा वासरे, म्हशीचे टोणगे दाटीवाटीने कोंबलेले होंते. पोलिसंानी चालक व मालक इम्रान रफिक खान (वय ४५) व क्लीनर शेख जिलानी नाजिम (दोघेही रा. जेऊर, ता. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे जनावरांच्या वाहतुकीचा कोणताही परवाना नव्हता. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी रक्षा अधिनियमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget