728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

विहीर, वीज, पाईपलाईन, अन् बैलगाडी द्या


अहमदनगर । DNA Live24 - दादासाहेब गायकवाड सबळीकरण लाभार्थी शेतकऱ्यांना पुर्णत: कर्जमाफी देवून, 7/12 कोरा करावा, प्रत्येक लाभार्थीस विहीर, वीज पुरवठा, पाईप लाईन, बैलगाडी व आवश्यक असणारे अवजारे समाजकल्याण मार्फत उपलब्ध करावे. प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी दादासाहेब गायकवाड सबळीकरण लाभार्थी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष रमेश तिजोरे, रिपाइंचे अशोक गायकवाड, भगवान वाघमारे, रमेश मोरे, नंदू वाकडे, सुधाकर काते, राजेंद्र तिजोरे, राजेंद्र राऊत, काकासाहेब कांबळे, भाऊसाहेब साळवे, गोरख जाधव, दानियल तिजोरे, नितीन निकाळजे, प्रमा मोरे, जीजाबाई घोडके, सुशीला दळवी आदिंसह लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

लाभार्थी शेतकऱ्यांना पुर्णत: कर्जमाफी द्यावी. 7/12 प्रमाणे जमीन मोजून, वहिवाटासाठी रस्ता खुला करुन द्यावा. प्रत्येक लाभार्थीस वि.का. सोसायटीचे सभासद करुन घ्यावे. समाज कल्याण मार्फत रमाई घरकुल योजनेमध्ये सदर लाभार्थींना समाविष्ट करावे. अण्णाभाऊ साठे व महात्मा फुले विकास महामंडळाचे कर्ज माफ करावे. शेतीसामग्रीसाठी घेण्यात आलेले सर्व कर्ज माफ करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी गोपीचंद कदम यांना देण्यात आले.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: विहीर, वीज, पाईपलाईन, अन् बैलगाडी द्या Rating: 5 Reviewed By: DNA Live24