History of Maharashtra

पंधरा वर्षांच्या मुलाचा ७३ वर्षीय महिलेशी ‘प्रेमविवाह’!

यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं. इंडोनेशियामध्ये पुरुषांसाठी लग्नाची वयोमर्यादा 19 वर्षे आहे.


जकार्ता । DNA Live24 - प्रेम आंधळे असते म्हणतात; पण काही जोड्या पाहिल्या की, प्रेम सपशेल आंधळे आणि बिनडोकही असते, असे म्हणावेसे वाटते. इंडोनेशियात एका 15 वर्षांच्या मुलाने 73 वर्षांच्या महिलेसोबत ‘प्रेमविवाह’ केला आहे. मुलगा अल्पवयीन असल्याने या जोडप्याला लग्न करण्यास परवानगी दिली जात नव्हती; पण लग्नात अडथळा आल्याने दोघांनी आत्महत्या करण्याची धमकी दिली.

या 15 वर्षांच्या सेलामत रियादीला मलेरिया झाला होता. या दरम्यान त्याच्या शेजारी राहणार्‍या रोहाया बिनती मोहम्मद जकफर या महिलेने त्याची शुश्रुषा केली होती. यानंतर दोघांमध्ये प्रेम फुललं. इंडोनेशियामध्ये पुरुषांसाठी लग्नाची वयोमर्यादा 19 वर्षे आहे. पण तरीही सुमात्रा गावाच्या प्रशासनाने या दोघांच्या लग्नासाठी मंजुरी दिली आहे.

गावाचे प्रमुख सिक ऐनी यांनी सांगितले की, सेलामत लग्नासाठी अजून फारच लहान आहे. तरीही आम्ही लग्नासाठी परवानगी दिली, कारण दोघांनीही आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. मुलगा अजून अल्पवयीन असल्याने आम्ही त्यांचं लग्न धूमधडाक्यात केलं नाही. सेलामतच्या वडिलांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर आईने दुसरं लग्न केलं होतं. लग्नानंतर आई काळजी घेत नव्हती, असं सेलामतने सांगितलं.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget