History of Maharashtra

दिव्यांग मुला-मुलींनी बनवले इको-फ्रेंडली गणराय

कलाकार हेमंत दंडवते यांनी स्नेहालय परिवार संचालित अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांग मुला-मुलीसाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवायला शिकवले.


अहमदनगर । DNA Live24 - नगरचे प्रसिद्ध कलाकार हेमंत दंडवते यांनी स्नेहालय परिवार संचालित अनामप्रेम संस्थेच्या दिव्यांग मुला-मुलीसाठी इको-फ्रेंडली गणेश मूर्ती बनवायला शिकवले. राज्यभर गणेशोत्सव जोरात सुरु आहे. वरून राजाची कृपा झाली आहे. दिव्यांग मुला-मुलींना नगरचे ख्यातनाम शिल्पकार आणि आर्टिस्ट हेमंत दंडवते यांनी कागद आणि मातीपासून मूर्ती कशा बनतात हे शिकवले.

अनामप्रेम मधील मुकबधीर मुलांना कागदापासून गणेश प्रतिमा बनवण्यास शिकवले. तसेच अनामप्रेमच्या अंध –दिव्यांग मुंल-मुलींनी मातीपासून गणेश-मूर्ती तयार केल्या. यातून दंडवते यांनी एक मूर्ती सर्व दिव्यांग मुला-मुलींचा सहभाग घेऊन पूर्ण केली. या मूर्तीची स्थापना सर्व दिव्यांगानी केली आहे. दंडवते यांनी कागद आणि मातीचा कसा खुबीने –कलात्मकतेने वापर केल्यास आपण अनेक शिल्प-कलाकृती बनवू शकत असल्यास सर्व दिव्यांग मुला-मुलींना प्रात्यक्षिकातून दाखवून दिले.

यावेळी अनामप्रेमच्या सत्यमेव जयते ग्राम आणि हिमत-भवन प्रकल्पातील ९० दिव्यांग उपस्थित होते. या कार्यशाळेमुळे सर्व दिव्यांगांचा सहभाग आणि आत्मविश्वास वाढला असल्याची माहिती अनामप्रेमचे बाळासाहेब तथा नाना भोरे, सुभाष शिंदे, अजित माने, किशोर कुलकर्णी यांनी सांगितले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget