History of Maharashtra

कोपर्डी खटला : आरोपींचा साक्षीदार १७ ला तपासणार

आरोपी संतोष भवाळ याच्या वतीने एक साक्षीदार तपासण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. खंडपीठाच्या आदेशानुसार या साक्षीदाराच्या नावाने शुक्रवारी समन्स काढले.


अहमदनगर । DNA Live24 - कोपर्डी (ता. कर्जत) खटल्यातील दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी संतोष भवाळच्या वतीने एक साक्षीदार तपासण्याची परवानगी औरंगाबाद खंडपीठाने दिली आहे. त्यामुळे खंडपीठाच्या आदेशानुसार या साक्षीदाराच्या नावाने जिल्हा सत्र न्यायालयाने शुक्रवारी समन्स काढले. या साक्षीदाराची साक्ष १७ ऑगस्टला नोंदवली जाणार आहे. त्याची उलटतपासणी विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे घेणार आहेत.

या खटल्यात सरकार पक्षाचे सर्व साक्षीपुरावे तपासून पूर्ण झालेले आहेत. तिन्ही आरोपींचे जबाबही नोंदवण्यात आले आहेत. दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी भवाळ याच्या वतीने बचाव पक्षाला रवींद्र चव्हाण, अॅड. उज्ज्वल निकम, डॉ. राजेंद्र थोरात (स्टेट ब्युरो ऑफ हेल्थ इंटेलिजन्स), डॉ. उदय निरगुडकर (संपादक), नाशिकच्या न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे डायरेक्टर व जिल्हाधिकारी अभय महाजन यांना साक्षीदार म्हणून तपासायचे होते. मात्र, जिल्हा सत्र न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली होती.

आरोपी भवाळच्या वतीने अॅड. बाळासाहेब खोपडे व विजयालक्ष्मी खोपडे यांनी औरंगाबाद हायकोर्टात पुनर्विलोकन अर्ज दाखल केला. त्यावर खंडपीठाने एकमेव रविंद्र चव्हाण यांनाच साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी आरोपीच्या वकिलांना दिली. इतर साक्षीदारांना तपासण्याची विनंती खंडपीठाने फेटाळून लावली. खंडपीठाच्या निर्णयाविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी आरोपींच्या वकिलांना काही दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीमध्ये आरोपीचे वकील सर्वोच्च न्यायालयात अपिल करु शकतात.

बचाव पक्षाचे पहिले साक्षीदार म्हणून रविंद्र चव्हाण यांना १७ ऑगस्टला न्यायालयात उपस्थित राहण्याचे समन्स शुक्रवारी निघाले. चव्हाण यांनी कोपर्डीतील घटनेच्या बातम्यांवर आधारित सीडी तयार करण्याचे काम केले होते. खंडपीठाच्या आदेशानुसार त्यांनाच बचाव पक्षातर्फे एकमेव साक्षीदार म्हणून तपासण्याची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे त्यांची साक्ष १७ ऑगस्टला नोंदवली जाणार आहे. त्यानंतर विशेष सरकारी वकील उज्वल निकम त्यांची उलटतपासणी घेणार आहेत.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget