History of Maharashtra

समृद्धी महामार्गसाठी नगर जिल्ह्यात भूसंपादन सुरु!

समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने थेट खरेदी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जमिनीची खरेदी केली आहे.अहमदनगर l DNA Live24 - प्रस्तावित महाराष्ट्र समृद्धी महामार्गासाठी राज्य सरकारने थेट खरेदी योजनेअंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात जमिनीची खरेदी केली आहे. या जिल्ह्यातून राज्य सरकारला ३५९.५३ हेक्टर इतकी जागा संपादित करायची आहे.


राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) माध्यमातून कोपरगाव तालुक्यातल्या धोत्रे गावातली जमीन खरेदी केली. या प्रकल्पासाठी दादासाहेब सर्जामान आधोडे यांनी आपल्या ०.९९ हेक्टर जमिनीच्या विक्रीखताची नोंदणी केली. त्यासाठी त्यांना ७८.२४ लाख रु. इतका मोबदला मिळाला. आरटीजीएसद्वारे त्यांच्या बँकखात्यात ही रक्कम जमा करण्यात आली.

एमएसआरडीसीचे उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनावणे, शिर्डीचे उपविभागीय अधिकारी रविंद्र ठाकरे, कोपरगावचे तहसीलदार किशोर कदम आणि इतर यावेळी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन म्हणाले, ‘धोत्रे गावापासून जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करताना आम्हाला आनंद होत आहे. आम्हाला खात्री आहे की, अशा जोरदार सुरुवातीनंतर, समृद्धी महामार्गासाठीच्या जमीन खरेदीला जमीनधारकांच्या प्रोत्साहनात्मक प्रतिसादामुळे पुढल्या काही दिवसांमध्ये वेग येईल.’

याआधी नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या सहा गावांमधल्या १२ जमीनधारकांकडून १३.४९ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. जमीनधारकांनी विक्रीखतांवर स्वाक्षऱ्या केल्या असून त्यांना थेट खरेदी योजनेमधून एकूण ८.४० कोटी रुपयांचा मोबदला मिळाला आहे. जिल्ह्यातल्या इगतपुरी तालुक्यातल्या तीन जमीनधारकांनी एमएसआरडीसी आणि जिल्ह्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विक्रीखतांवर स्वाक्षऱ्या केल्या. हे सर्व शेतकरी धामणगाव गावातले आहेत. संतोष पांडुरंग जाधव यांना १ हेक्टर जमीन विकल्याचे १.६२ कोटी रुपये मिळाले तर श्री. संतोष पांडुरंग जाधव आणि श्री. पांडुरंग गणू जाधव यांनी अनुक्रमे ०.९९ आणि ०.१० हेक्टर जमीन विकल्याचा १.९७ कोटी आणि  ७१ लाख रुपये इतका मोबदला मिळाला.

नाशिकमधल्या जमीनखरेदीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला एमएसआरडीसीचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर, विभागीय आयुक्त महेश झगडे, जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आणि इतर अधिकारी उपस्थित होते.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget