History of Maharashtra

सरकारच घालतंय डॉ. दाभोलकरांच्या आरोपींना पाठीशी !

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांसारख्या समाजसुधारकांच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. यांचे मारेकरी कोण, हे माहिती असूनही शासन त्यांना पकडत नाही.

मुसळधार पावसातही 'अंनिस'चा माॅर्निंग वॉकअहमदनगर । DNA Live24 - महाराष्ट्रासह संपूर्ण देशात आज असहिष्णुतेचे वातावरण आहे. पुरोगामी विचारांच्या मदतीने समाजपरिवर्तनाचे कार्य करणाऱ्या डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांसारख्या समाजसुधारकांच्या निर्घृणपणे हत्या झाल्या. यांचे मारेकरी कोण, हे माहिती असूनही शासन त्यांना पकडत नाही. उलट शासनच मारेकऱ्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप मुसळधार पावसात अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष सचिव अॅड. रंजना गवांदे यांनी केला. "जवाब दो' मोहिमेअंतर्गत अंनिसने शहरात 'मॉर्निंग वॉक'चे आयोजन केले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने पुरोगामी विचारसरणी व समविचारी संघटनांच्या सहभागाने रविवारी सकाळी जवाब दो आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाच्या समारोपप्रसंगी अॅड. रंजना गवांदे यांनी आंदोलनामागची भूमिका विषद केली. डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाला चार वर्षे झाली. कॉ. गोविंद पानसरे, प्रा. कलबुर्गी यांच्याही हत्या होऊन अद्याप आराेपींना शासन पकडू शकलेले नाही. शासनच त्यांना पाठीशी घालतंय का, असा सवाल गवांदे यांनी केला. 

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व डॉ. एस. एम.कलबुर्गी यांच्यावर मारेकऱ्यांनी मॉर्निंग वॉकला निघाले असताना बंदुकीने गोळ्या झाडल्या होत्या. त्या घटनेचे औचित्य साधुन महाराष्ट्र अंनिस व समविचारी संघटनांनी राज्यभर मॉर्निंग वॉक काढला. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मॉर्निंग वॉकला सुरूवात झाली. तेथून आंदोलक बंगाल चौकी, डावरे गल्ली, एम. जी. रोड, सर्जेपुरा, सिव्हिल हॉस्पिटल यामार्गे शहीद भगतसिंग यांच्या स्मारकाजवळ येऊन जवाब दो आंदोलनाचा समारोप  करण्यात आला. 

आंदोलनात महाराष्ट्र अंनिस अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष प्रमोद भारुळे, डॉ. प्रकाश गरुड, प्राचार्य अशोक गवांदे, डॉ. संजय लढ्ढा, काशिनाथ गुंजाळ, स्मिता पानसरे, विजया भारुळे, पी. बी. कांबळे, महेश धनवटे, प्रशांत पानसरे, अरविंद गाडेकर, रवी सातपुते, अर्जुन हरेल, मनोज हांडे, महेश फटांगरे, किसन माने, राहुल सागडे, दिलीप फडके, चिमाजी धनवटे, गणेश चेके, संजय नांगरे, अविनाश देशमुख, संध्या मेढे, निलिमा बंडेलु, पद्मजा गरुड यांच्यासह पुरोगामी विचारांच्या संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. 

'जवाब दो' - फेरी मार्गावर कार्यकर्त्यांनी ‘जबाब दो’चा जोरदार नारा देत तपास यंत्रणा, शासन व्यवस्थांना जाब विचारला व सामान्य नागरिकांना या दडपशाही विरोधात ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हा घाला आम्ही सर्व डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे व प्रा. कलबुर्गी जीवाची बाजी लावुन परतवुन लावु, अशा भावना व्यक्त केल्या. जोपर्यंत परिवर्तनाच्या लढाईत खऱ्या आरोपींना कठोर शिक्षा होत नाही, तोपर्यंत ही लढाई सुरूच राहिल, असा निर्धार यावेळी करण्यात आला.
 'लढाई कायम' - शनिवारी रात्रीपासून शहरात पावसाने दमदार हजेरी लावली होती. तरीही रविवारी मुसळधार पावसात मॉर्निंग वॉक निघाला. गुन्हेगार व समाजद्रोही शक्तींना शासन व तपास यंत्रणांनी पाठीशी घालण्याचा डाव रचला  आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. सरकारच्या कुटिल डावाचा अंनिसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. विवेकाच्या मार्गाने सुरू असलेली ही लढाई गुन्हेगारांचा तपास लागेस्तोवर  प्राणपणाने लढण्याचा निर्धारही यावेळी सर्वांनी व्यक्त केला.
ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget