History of Maharashtra

हॉटेल यश ग्रँडमध्ये प्रतिष्ठितांचा जुगार अड्डा

रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल यश ग्रँडमध्ये सुरु असलेल्या प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. गुरुवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत काँग्रेसचा माजी नगरसेवक सुनिल कोतकर व इतर ८ जणांना जेरबंद करण्यात आले.


अहमदनगर । DNA Live24 - रेल्वे स्टेशन परिसरातील हॉटेल यश ग्रँडमध्ये सुरु असलेल्या प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्यावर कोतवाली पोलिसांनी छापा टाकला. गुरुवारी मध्यरात्री केलेल्या या कारवाईत काँग्रेसचा माजी नगरसेवक सुनिल कोतकर व इतर ८ जणांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्या ताब्यातून ३ लाख ६ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हॉटेल यश ग्रँड शिवसेनेचे दक्षिण जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांचे आहे. हॉटेलचा मॅनेजर जुगार अड्ड्यासाठी खोली उपलब्ध करुन देत होता.

काही प्रतिष्ठित लोक रेल्वे स्टेशन परिसरातील यश ग्रँड हॉटेलमध्ये जुगार खेळत असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, शहर विभागाचे सहायक पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवालीचे पोलिस उपनिरीक्षक शिवाजी नागवे, रविंद्र टकले, सुमित गवळी आदींच्या पथकाने हॉटेलमध्ये छापा टाकला असता रुम नं. ४०६ मध्ये ९ जण जुगार खेळत होते.

मच्छिंद्र त्रिंबक शेळके (धानोरा, बीड), बाजीराव यशवंत येवले (केडगाव), मधुकर नाथाजी मोहिते (कल्याण रोड), राजेंद्र मारुती ससे (प्रेमदान चौक), बाळासाहेब शाहुराव गारुडकर (केडगाव), संतोष चुन्नीलाल पितळे (केडगाव), दत्तात्रय खुशालचंद गिरमे (लोंढेमळा, केडगाव), वैभव दिलीप भोगाडे (सावेडी) व सुनिल सर्जेराव कोतकर (केडगाव) हे नऊ जण जुगार खेळत होते. हॉटेलचा मॅनेजर सचिन अशोक शिंदे याने त्यांना खोली उपलब्ध करुन दिली होती.

पोलिसांनी घटनस्थळाहून रोकड, महागडे मोबाईल व जुगाराची साधने जप्त केली आहेत. याप्रकरणी पोलिस कर्मचारी सुमित गवळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मुंबई जुगार कायदा कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस करीत आहेत. अलिशान हॉटेलांमध्ये जुगार अड्डे चालत असल्याचे या कारवाईमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget