History of Maharashtra

हॅकर्सचा पाकिस्तानला दणका; अधिकृत वेबसाईटवर भारताचे राष्ट्रगीतइस्लामाबाद । DNA Live24 - पाकिस्तान सरकारची वेबसाईट गुरुवारी हॅक करण्यात आली. हॅकिंगनंतर वेबसाईटवर राष्ट्रगीत लिहिण्यात आलं आणि स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. तातडीने ही पोस्ट हटवण्यातही आली.


पाकिस्तान सरकारची pakistan.gov.pk ही अधिकृत वेबसाईट हॅक करुन त्यावर Hacked by Ne0-h4ck3r असं लिहिण्यात आलं होतं.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानी हॅकर्सकडून भारतातील प्रमुख चार संस्थांची वेबसाईट हॅक करण्यात आली होती. यामध्ये आयआयटी दिल्ली, आयआयटी बनारस, अलिगड मुस्लीम विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापीठाच्या वेबसाईटचा समावेश होता. यानंतर पाकिस्तानच्याही अनेक वेबसाईट हॅक केल्याचा दावा भारतीय हॅकर्सकडून सातत्याने करण्यात येत आहे.

पाकिस्तानच्या वेबसाईटवर भारतीय स्वातंत्र्यादिनाचा शुभेच्छा संदेश आणि राष्ट्रगीत लिहिण्यात आलं होतं. ते तातडीने हटवण्यात आलं असलं तरी पाकिस्तानने यावर अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget