History of Maharashtra

'राजे संभाजी'च्या विद्यार्थिनींकडून जवानांना राख्या

कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात नुकताच जवानांसाठी रक्षाबंधन हा उपकम राबवण्यात आला. यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या.


नेवासे । DNA Live24 - नेवासे तालुक्यातील कौठा येथील राजे संभाजी माध्यमिक विद्यालयात नुकताच 'जवानांसाठी रक्षाबंधन' हा उपकम राबवण्यात आला. या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी होत विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींनी भारतीय सीमेवरील जवानांना राख्या पाठवल्या. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर या नानाविध प्रकारच्या राख्या व शुभेच्छापत्रे सीमेवरील जवानांना पाठवल्या. 

विद्यालयाच्या सर्व विद्यार्थिनींच्या सहकार्याने जवानांसाठी रक्षाबंधन हा उपक्रम राबवण्यात आला. भारतीय जवान देशासाठी प्राणाची बाजी लावून, ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची कोणतीही तमा न बाळगता डोळ्यात तेल घालून सीमेवर खडा पहारा देतात. आपले सैनिक बांधव कर्तव्य बजावत असल्याने रक्षाबंधन सणासाठी ते घराकडे बहिणीकडे येऊ शकत नाहीत. या जवानांना पाठबळ मिळावे, ते करीत असलेल्या देशसेवेरुपी उपकारातून उतराई व्हावे, या उद्देशाने विद्यालयातील सर्व विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेत राख्या व शुभेच्छापत्रे पाठवली. 

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. उद्धव सोनवणे सर, भाऊसाहेब जाधव, सुधाकर आवारे, अंकुश आघाव, सतीश उदमले, राहुल शिरसाठ, बापू काळे, अंबादास मिसाळ, माधवी जोशी, प्रिती नाईक, बाळासाहेब जाधव, राजेंद्र केकाण, विजय दानवे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. राजे सभांजी विद्यालयात सामाजिक जाणिवा समृद्ध करणारे वेगवेगळे उपक्रम नेहमीच राबवले जातात. रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाचेही परिसरात कौतुक होत आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget