History of Maharashtra

चांद्यात दत्त मंदिराच्या भक्तनिवासाचे लोकार्पण

धर्महितासह राष्ट्रहित जोपासणे महत्वाचे : भास्करगिरीजी महाराज


चांदा । DNA Live24 - राष्ट्रीय एकात्मतेसाठी शासनाने विविध प्रकारचे कायदे केले. मात्र फक्त कायदे करून उपयोग नाही तर, प्रत्येकाच्या मनात एकात्मता रुजवावी लागेल. ईश्वरी चिंतन करताना आपण धर्महित जोपासतो. परंतु धर्महितासह राष्ट्रहित हे परमकर्तव्य म्हणून जोपासणे महत्वाचे असून ती जबाबदारी साधकांची असल्याचे  प्रतिपादन देवगड देवस्थानचे प्रमुख गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांनी केले.

नेवासा तालुक्यातील चांदा येथील श्री दत्त साधकाश्रमाच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत बांधण्यात आलेल्या भक्तनिवासाचे लोकार्पण व सभामंडपाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते प्रशांत गडाख होते. प्रमुख पाहुणे म्हणून आ. बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर देवस्थानचे मठाधिपती शिवाजी महाराज देशमुख, मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे, रिपब्लिकन पक्षाचे अशोक गायकवाड आदी उपस्थित होते. देवस्थानचे मठाधिपती ह. भ. प. रोहीदासजी महाराज यांनी सुरुवातीस सुरु असलेल्या विकासकामांची माहिती दिली. 

यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी जावळे, माजी सदस्य अनिल अडसुरे, सरपंच सुवर्णलता अभिनव, उपसरपंच संजय भगत, मुळा बँकेचे उपाध्यक्ष प्रकाश भालके, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कैलास दहातोंडे, एकनाथ जावळे, माधवराव दहातोंडे, सोसायटीचे उपाध्यक्ष चंद्रकांत जावळे, बाळासाहेब सोनवणे, रशीद इनामदार, रवींद्र जावळे आदींसह हजारो भक्तगण उपस्थित होते.

भास्करगिरी महाराज म्हणाले की, चांद्यातील हे दत्त मंदिर फक्त गावाचे वैभव नसून, संपूर्ण धर्माचे वैभव आहे. रोहिदास महाराजांनी अत्यंत खडतर परिस्थितीवर मात करत भव्य दिव्य असे मंदिर उभारले. गावातील राजकीय नेते हे धार्मिक कार्यासाठी एकत्र येत असल्याने चांदा गाव विकासकामांच्या बाबतीत भाग्यवान आहे.

प्रशांत गडाख म्हणाले की, चांदा गाव कलासक्त असून, याठिकाणी अनेक कला भरलेल्या आहेत. विकासकामांच्या बाबतीत एकत्र येत राजकारणात आम्हाला गावाने अनेकदा धक्के दिले. हे चांगले आहे. आजच्या तरुणांनी अध्यात्माकडे वळले पाहिजे. पद हे महत्वाचे न मानता कार्य महत्वाचे मानले पाहिजे. शिवाजी महाराज देशमुख, संभाजी दहातोंडे, अशोक गायकवाड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

आ. मुरकुटे म्हणाले की, या देवस्थानला निधी मिळवून देण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. या कामात राजकारण आले नाही. यापुढेही देवस्थानसाठी सर्वोतोपरी सहकार्य करून देवस्थानला निधीची कमतरता भासू देणार नाही. भास्करगिरी महाराज यांची पंढरपूर देवस्थानच्या विश्वस्तपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय आखाडे यांनी केले.

संत, महंतांचा जमला मेळा…
या कार्यक्रमासाठी जिल्हाभरातील संत, महंतांचा मेळा याठिकाणी जमला होता. मुक्ताई आश्रमाचे गोपालगिरी महाराज, सोनईचे पंढरीनाथ महाराज तांदळे, अशोक महाराज कर्डिले, शिवाजी महाराज चिंधे, पेहेरे महाराज, ज्ञानेश्वर महाराज तांबे, बिरदवडे महाराज, धुराजी महाराज काळे, कोकाटे महाराज, हरेराम महाराज गाडे, अण्णा महाराज बोरुडे, कारभारी महाराज पंडित, बाबुराव महाराज सोनवणे, बाजीराव महाराज जाधव, देविदास आडभाई आदी उपस्थित होते. भास्करगिरी महाराज यांनीही बोलताना संत,महंतांना एकत्र आणणे अवघड असताना रोहिदास महाराजांनी ते कार्य केल्याचा आवर्जून उल्लेख केला.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget