728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सोनिया गांधी बरसल्या; आरएसएस वर संसदेत शाब्दिक हल्ला!


नवी दिल्ली । DNA Live24 - 'छोडो भारत आंदोलनात जे सर्वात अग्रभागी होते, अशा शहिदांना आज आपण मानवंदना देत आहोत. पण त्याही काळात या आंदोलनाला विरोध करणारे लोक आणि संघटना होत्या. छोडो भारत आंदोलनाला विरोध करणाऱ्यांचं देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात काडीचंही योगदान नव्हतं. हे विसरता कामा नये,' अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर अप्रत्यक्षपणे संसदेत जोरदार हल्ला चढविला.

'छोडो भारत' आंदोलनाला आज ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलविण्यात आलं होतं. त्यानिमित्त संसदेत भाषण करताना सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढविला. सध्या देशात अंधकारमय वातावरण आहे. कायद्याच्या राज्यात काही विध्वंसक शक्ती वरचढ होताना दिसत आहेत, असा टोला सोनिया यांनी लगावला.

यावेळी सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्य लढ्यातील काँग्रेसच्या योगदानालाही उजाळा दिला. 'देशाच्या स्वातंत्र्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते तुरुंगात गेले, त्यांना आजारपणामुळे तुरुंगातच मृत्यूला कवटाळावे लागले. पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही प्रदीर्घ काळ तुरुंगात रहावे लागल्याचं सोनिया यांनी स्पष्ट केलं. सोनिया यांनी या भाषणात संघाचं नाव न घेता त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाचा पंचनामा केला, तेव्हा तिळपापड झालेल्या भाजप सदस्यांनी संसदेत गोंधळ घालत त्यांच्या भाषणात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सोनिया गांधी बरसल्या; आरएसएस वर संसदेत शाब्दिक हल्ला! Rating: 5 Reviewed By: DNA Live24