History of Maharashtra

बारा तास अभ्यास करुन अण्णाभाऊंना अभिवादन !

अण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त 'एक्सेल अॅकॅडमी'ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. अण्णाभाऊंच्या जयंंतीनिमित्त या अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सलग बारा तास अभ्यास करुन अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केले

नांदेड । DNA Live24 - अण्णाभाऊ साठे यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त 'एक्सेल अॅकॅडमी'ने एक आगळा वेगळा उपक्रम राबवला आहे. अण्णाभाऊंच्या जयंंतीनिमित्त या अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी सलग बारा तास अभ्यास करुन अण्णाभाऊ साठेंना अभिवादन केले अाहे. या अॅकॅडमीचे सुमारे दीडशे विद्यार्थी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभाग घेतला.  

२८ जुलैला लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंतीच्या पार्श्वभूमीवर हा उपक्रम राबवण्यात आला. सार्वजनिक जयंती महाेेत्सव समितीच्या कल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानात नांदेड परिसरातील विद्यार्थी, पालक, वाचक व सूज्ञ नागरिक सहभागी झाले. सहशिक्षक आदित्य हणमंते, आदित्य गव्हाणे, इतरांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

हा आगळावेगळा उपक्रम पाहण्यासाठी पुढील व्हिडिओवर क्लिक करा... (सौजन्य : एनटीव्ही न्युुज)


Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget