728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

गुड न्युज : 'वाडिया पार्क'वर लौकरच आंतराष्ट्रीय दर्जाची टर्फ खेळपट्टी !


अहमदनगर । DNA Live24 - जिल्ह्यातील क्रिक्रेट खेळाडूंचा दर्जा सुधारुन, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व रणजी सारखे सामने शहरात होण्याच्या दृष्टीकोनातून वाडियापार्क क्रीडा संकुल येथे लौकरच आंतराष्ट्रीय दर्जाची टर्फ विकेट (खेळपट्टी) तयार करण्यात येणार आहे, अशी घोषणा एमसीएचे सचिव रियाज बागवान यांनी केली. बागवान यांनी रविवारी भर पावसात वाडिया पार्क क्रीडा संकुलातील क्रिकेट मैदानाची पहाणी करुन, टर्फ खेळपट्टीचे काम तातडीने सुरु करण्याच्या सुचना दिल्या.

जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अामदार अरुण जगताप यांनी एमसीएशी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. या खेळपट्टीसाठी स्वत: लक्ष घालून काम मार्गी लावणार असल्याचे आमदार जगताप म्हणाले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष माणिक विधाते, राजेंद्र चोपडा, डॉ. विजय भंडारी, ज्ञानेश्‍वर रासकर, गणेश गोंडाळ, ज्ञानदेव पांडूळे, श्रीकांत निंबाळकर, अ‍ॅड. प्रसन्ना जोशी, वसिम हुंडेकरी, संपत बाफना, संदीप घोडके, लक्ष्मीकांत वारे आदिंसह क्रिकेट खेळाडू उपस्थित होते.

प्रास्ताविकात माणिक विधाते म्हणाले की, नगरसाठी टर्फ विकेटची अत्यंत गरज होती. खेळाडूंमध्ये गुणवत्ता असून, त्यांना उत्तम खेळपट्टीची आवश्यकता होती. हा प्रश्‍न आमदार जगताप यांच्या माध्यमातून सोडविण्यात आला आहे. जिल्ह्यातील अनेक खेळाडू क्रिकेटमध्ये पुढे येत असून, या खेळपट्टीचा त्यांना निश्‍चित फायदा होईल. रियाज बागवान म्हणाले, नगरचे खेळाडू राज्याच्या संघात आपल्या गुणवत्तेची छाप पाडत आहेत. त्यांचे खेळ आता अजून उत्कृष्ट होईल. 

आमदार अरुण जगताप यांनी एमसीएच्या बैठकित नगर जिल्ह्यातील क्रीडा संकुलाचा खेळपट्टीचा प्रश्‍न लावून धरला होता. त्याला प्रतिसाद देत या खेळपट्टीचे काम लवकरच मार्गी लावले जाणार आहे. महाराष्ट्राच्या क्रिकेट संघात नगरच्या खेळाडूंचा मोठा सहभाग असून, ते उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आहे. नगर जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये मोठे टॅलेण्ट आहे. मात्र उत्तम मैदान व खेळपट्टी पासून खेळाडू वंचित होते. त्यांना लवकरच उत्तम दर्जाची खेळपट्टी अनुभवयास मिळणार आहे.

आमदार जगताप म्हणाले, कायदेशीर बाबी पुर्ण करण्यात बराच काळावधी लोटला. मात्र स्वत: लक्ष घालून वाडिया पार्क क्रीडा संकुलात टर्फ विकेट व उत्तम प्रकारे मैदान खेळाडूंसाठी तयार केले जाईल. या कामासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी उदय जोशी यांचे सहकार्य लाभले. नगरमध्ये अनेक उत्कृष्ट खेळाडू पुढे येत असून, या खेळपट्टीचा फायदा त्यांना होईल. वाडियापार्क मध्ये राज्यस्तरीय सामने खेळवता येतील. श्रीलंकेत भारतीय वकिल संघातर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अजय शितोळे यांचा यावेळी सत्कार झाला.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: गुड न्युज : 'वाडिया पार्क'वर लौकरच आंतराष्ट्रीय दर्जाची टर्फ खेळपट्टी ! Rating: 5 Reviewed By: DNA Live24