History of Maharashtra

अहमदनगरमध्ये सैन्यातील जवानांनी केले रक्‍तदान

या रक्‍तदान शिबीरात अनेक जवान व सी.क्‍यू.ए कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्‍तदान करुन या शिबीराला चांगला प्रतिसाद दिला.


अहमदनगर । DNA Live24 - भारत सरकार रक्षा मंत्रालय, गुणता आश्‍वासन नियंत्रणालय (वाहन), अहमदनगर यांच्‍यावतीने आज दिनांक 15 सप्‍टेंबर, 2017 रोजी सी. क्‍यू. ए ये‍थील सहयाद्री हॉलमध्‍ये रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आले होते.

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्‍थानच्‍या साईनाथ रक्‍तपेढीकडून रक्‍त संकलन करण्‍यात आले.  या रक्‍तदान शिबीरात अनेक जवान व सी.क्‍यू.ए कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्‍तदान करुन या शिबीराला  चांगला  प्रतिसाद दिला.

यावेळी बिग्रेडियर संजीव सिंग, संयुक्‍त नियंत्रक कर्नल पी. के. श्रीवास्‍तव,  कर्नल एस. एस. गरेवाल, कर्नल ए. के. सिंग,  संघटन अध्‍यक्ष संजय गाढे, संघटन जनरल सेक्रेटरी श्रीमती राणी थिम्‍मराज, कार्यकारी समितीचे जॉईंट सेक्रेटरी प्रमोद साखरे यांच्‍यासह वरिष्‍ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

रक्‍त संकलनासाठी डॉ. पाटील, सुनिल कर्जूले, मिलिंद आराक, अशोक सातभाई व श्रीमती दिवेकर   उपस्थित होते.  यावेळी  जवानांनी  व सी.क्‍यू. ए कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी रक्‍तदान केले.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget