History of Maharashtra

डॉ. अमोल बागूल यांनी साकारला 'मि. इंडिया'चा हलता देखावा

परिचारिका, सफाई कामगार, याचक, कचरावेचक, वेटर, वॉचमन आदिंना आरतीचा मान दिला जातो.


नगर । DNA Live24 - येथील हरहुन्नरी कलाकार राष्ट्रपतिपदक विजेते डॉ.अमोल बागूल यांनी सुमारे २५० मुर्त्या व ५००० चित्रांच्या मदतीने घरगुती पर्यावरणपुरक आराशीत भारताच्या संस्कृती–परम्परा व आधुनिकता दर्शवणारा 'मिस्टर इंडिया' हा हलता देखावा साकारला असून, उपेक्षितांच्या हस्ते रोज आरतीबरोबर राष्ट्रगीत व वंदे मातरम् देखील सादर होते. प्रसादाबरोबर वृक्षांच्या बिया दिल्या जातात. 'मंगलमूर्ति मोरया'बरोबरच 'भारत माता की जय'चा गजर घुमतो.

शाडू मातीची कागदी लगदयापासून निर्मित 'श्री'मूर्ती बागूल यांनी साकारली असून, तिचे विसर्जन घरीच बादलीत केले जाणार आहे. परिचारिका, सफाई कामगार, याचक, कचरावेचक, वेटर, वॉचमन आदिंना आरतीचा मान दिला जातो.

१० बाय १५ फुटांच्या भारताच्या कागदी नकाशात सुमारे २५० हलत्या मुर्त्यांच्या माध्यमातून देशातील प्रत्येक राज्याचे वैशिष्ट्य दर्शवणारी लोककलानृत्य सादर केले आहे. गणेशभक्ताने टाळी वाजवल्यास ह्या हलत्या मुर्त्यांचे नृत्य सुरु होते.

भारताचा प्राचीन इतिहास, आधुनिक वर्तमान, सशक्तिकरणाकड़े भारताची वाटचाल, संविधान, प्रत्येक राज्याचे स्थान, हवामान, लोकजीवन, शेती, उद्योगधंदे, पर्यावरण, वने, लोकसंख्या, मतदान, स्वच्छता, संरक्षण, व्यसनमुक्ती,  साहित्यिक, सांस्कृतिक, शैक्षणिक वाटचाल आदि घटक सुमारे ५००० चित्रांच्या माध्यमातून व एल.इ.डी.वर 'स्लाइड शो'च्या माध्यामातून डॉ.बागुल यांनी प्रस्तुत केले आहे.

कागद, कापड, पुष्ठा, लाकुड़,  माती आदि निसर्गात सहज विघटन होणाऱ्या घटकांपासून मि. इंडियातील साहित्य तयार करण्यात आले असून,  मतदारदूत डॉ.बागूल यांनी मतदारयादीसाठी विविध नोंदीसाठी आवश्यक फॉर्म व्यवस्थाही देखाव्यात कली आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget