History of Maharashtra

कोपरगाव राजकारण : 'प्रवरे'च्या रसदीने काळे 'पॉवरफुल'; 'कोल्हें'च्या अडचणीत वाढ !

विजयाचे श्रेय नेतृत्व म्हणून आशुतोष यांना जरी देण्यात येत असले तरी यात परजणे यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही.


कोपरगाव । DNA Live24 विशेष - गेल्या तीन दशकांपासून काळे व कोल्हे या दिग्गजांच्या भोवती फिरत असलेले कोपरगाव तालुक्याचे राजकारण काहीसे अनोखेच म्हणावे लागेल. आलटून-पालटून काळे व कोल्हे यांच्याच ताब्यात तालुक्यातील सर्व सत्ता समीकरणे आहेत. विधानसभा निवडणुकीत विजयश्री खेचून आणलेल्या आ. स्नेहलता कोल्हे यांचे राजकारण दिवसेंदिवस ढासळत आहे. प्रवरेची रसद मिळू लागल्याने तालुक्यात काळेंचे प्रस्थ वाढत चालले असून, कोल्हेंच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे.

सलग दोन टर्म आमदारकी भूषविल्यानंतर तिसर्यांदाही आमदारकी गळ्यात पडेल या भ्रमात असलेल्या काळे कुटुंबाला २०१४ मध्ये स्नेहलता कोल्हे यांनी धूळ चारली. आमदारकी आली म्हणजे तालुक्यातील सर्व सत्ता आपल्या ताब्यात येतील असा कयास कोल्हे यांना होता. मात्र त्यानंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत काळे यांनी जोमाने लढा देत कोल्हे यांना अस्मान दाखविले.

(ताज्या बातम्यांसाठी www.dnalive24.com ला अवश्य भेट द्या)

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ना. शालिनीताई विखे यांचे बंधू असलेल्या राजेश आबा परजणे यांच्या साथीने काळे यांनी कोल्हे गटाचा धुव्वा उडविला. विजयाचे श्रेय नेतृत्व म्हणून आशुतोष यांना जरी देण्यात येत असले तरी यात परजणे यांचे योगदान दुर्लक्षून चालणार नाही. उमेदवार निवड, त्याला दिले जाणारे पाठबळ, राजकीय मुद्यांची निवड आणि या प्रक्रियेवर आपला ठसा उमटविण्याचे कौशल्य अलिकडे आशुतोष काळे व परजणे यांनी दाखवून दिले आहे. 

(ताज्या बातम्यांसाठी www.dnalive24.com ला अवश्य भेट द्या)

संजीवनी ग्रुप ताब्यात असल्याने अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आ.स्नेहलता कोल्हे यांचे आव्हान पेलणे तसे अवघड काम होते. कोपरगाव नगरपालिकेसाठी काळे यांनी जोरदार प्रयत्न केले. मात्र कोल्हे गट याठिकाणी वरचढ ठरला. कोल्हे गट नगरपालिकेत मोठ्या संख्येने असला तरी खुल्या पद्धतीने निवडून आलेल्या वहाडणे यांनी काळे व कोल्हे दोन्ही गटांना दणका दिला. याठिकाणी भाजपचा उमेदवार पिछाडीवर राहिल्याने कोपरगाव शहरात कोल्हे यांना लक्ष घालावे लागणार आहे.

(ताज्या बातम्यांसाठी www.dnalive24.com ला अवश्य भेट द्या)

इतके सगळे घडत असतांना आ. असलेल्या स्नेहालताताई कोल्हे या इतक्या शांत कशा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाकडूनच त्यांना शांततेचे आवाहन करण्यात आल्याची माहिती आहे. विधानसभेच्या दीड वर्ष आधी आ. कोल्हे या फोर्मात येण्याची शक्यता निकटवर्तीय वर्तवितात. त्यांची वेट एन्ड वॉचची भूमिका फायद्याची ठरणार की तोट्याची हे येणारा काळच ठरवेल.

वहाडणे देणार प्रस्तापितांना शह...?  - कोपरगाव शहरात कोल्हे यांच्या उमेदवारापेक्षा नगराध्यक्ष पदासाठी वहाडणे यांना जास्त मते मिळाली. वहाडणे यांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून, वहाडणे यांचा उदय हा काळे व कोल्हे या दोन्ही गटांसाठी धोक्याची घंटा ठरू पाहत आहे. तालुक्यातही वहाडणे यांनी लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे काळे व कोल्हे यांच्या प्रस्थापित राजकारणाला वैतागलेला मतदार राजा वहाडणे यांच्या पारड्यात मत'दान'  टाकू शकतो.

(ताज्या बातम्यांसाठी www.dnalive24.com ला अवश्य भेट द्या)
----------------------
हेही वाचा 

नगरी राजकारण : शिवसेनेच्या 'अनिलभैय्यांना' भाजपकडून 'गळ'!

कॉंग्रेसच्या सत्यजित तांबेंचे उड्डाण कुणीकडे...?

नगर महापालिकेसाठी वर्षभरात कोणता निधी आणला? आ. संग्राम जगतापांचा शिवसेनेला सवाल

नगर शहर शिवसेनेत इनकमिंग जोरात. विधानसभेसाठी कार्यकर्त्यांची पेरणी सुरु!

 ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget