History of Maharashtra

जलयुक्‍त शिवार अभियानामुळेच जलक्रांती - पालकमंत्री

जलयुक्‍त शिवार अभियानामुळेच जलक्रांती झाल्‍याचे मत पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी व्‍यक्‍त केले.


कर्जत । DNA Live24 - जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून राज्‍यातील अनेक गावात पथदर्शी काम झाले असून या कामामुळे  जलस्‍वयंपूर्ण  गावांच्‍या संख्‍येत भर पडली आहे. जलयुक्‍त शिवार अभियानामुळेच जलक्रांती झाल्‍याचे मत महाराष्‍ट्र राज्‍याचे जलसंधारण व राजशिष्‍टचार, विमुक्‍त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्‍याणमंत्री तथा  जिल्‍हयाचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे  यांनी व्‍यक्‍त केले.

कर्जत तालुक्‍यातील मिरजगांव येथे जलयुक्‍त शिवार अभियानांतर्गत उकरी नदीवरील साखळी बंधा-यातील जलपूजन पालकमंत्री प्रा. शिंदे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात प्रा. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्‍या अध्‍यक्षस्‍थानी रमेश झरकर  उपस्थित होते. यावेळी कर्जतचे नगराध्‍यक्ष नामदेव राऊत, पंचायत समितीचे सभापती बापूसाहेब शेळके, उपसभापती प्रशांत बुध्‍दीवंत,  पंचायत समितीचे सदस्‍य बाबा गांगर्डे, मिरजगावचे सरपंच नितिन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, उप अभियंता कानगुडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता बागूल  आदी उपस्थित होते.

जलयुक्‍त शिवार अभियानाच्‍या माध्‍यमातून गावासोबतच शिवारही  पाणीदार झाल्‍याचे सांगून प्रा. शिंदे म्‍हणाले,  मिरजगाव येथे जलयुक्तच्‍या माध्‍यमातून उकरी नदीवर 11 किलोमीटरमध्‍ये  12 बंधारे पाण्‍याने तुडूंब भरले आहेत. कृषी, जलसंधारण विभागाने चांगले काम या माध्‍यमातून उभे केले  आहे.  शेतक-यांसाठी ही आनंदाची बाब आहे. नदी पुर्नजीवन , बंधारे, रस्‍त्‍यांची कामे, पाणीपुरवठा आदी कामांसाठी आपला पाठपुरावा सुरु असून  गावच्‍या सर्वांगीण विकासासाठी प्रलंबित प्रश्‍न तातडीने सोडविण्‍यात येतील असे त्‍यांनी सांगितले.

प्रा. शिंदे म्‍हणाले, छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी या राज्‍य सरकारच्‍या महत्‍वाकांक्षी योजनेचा लाभ सर्व पात्र लाभार्थी शेतक-यांना मिळणार आहे. पारदर्शक व गतीमान सरकार असून समाजातील शेवटच्‍या घटकापर्यंत योजनांचा लाभ पोहचविण्‍यासाठी शासन कटीबध्‍द असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. यावेळी मिरजगावचे सरपंच नितिन खेतमाळस, उपसरपंच अमृत लिंगडे, रमेश झरकर, शेतकरी विजय माने यांनी आपले विचार व्‍यक्‍त केले. तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर  यांनी मिरजगाव येथील जलयुक्‍त अभियानाच्‍या कामासंदर्भात सादरीकरण केले. ग्रामस्‍थ, शेतकरी मोठया संख्‍येने उपस्थित होते.  यासोबतच खैरी मध्‍यम प्रकल्‍प, मोहरी, निमगांव गांगर्डा  येथे ही आज पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी जलपूजन केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी  केला जलविहार - मिरजगाव येथील जलयुक्‍त शिवार अभियानातील यश पाहून व ठिकठिकाणच्‍या जलसाठयातील पाणी पाहून पालकमंत्री प्रा. शिंदे यांना पोहण्‍याचा मोह आवरला नाही. त्‍यांनी  मिरजगाव येथील बंधा-यात मुक्‍तपणे जलविहार केला.           

पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्‍या वाढदिवसा निमित्‍त स्‍वच्‍छता मोहिम - पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांच्‍या वाढदिवसानिमित्‍त  जामखेड येथे  एस.टी.  बसस्‍थानक व बाजारतळ येथे स्‍वच्‍छता अभियांतर्गत स्‍वच्‍छता मोहिम राबविण्‍यात आली.  पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी  बसस्‍थानक व बाजारतळ  स्‍वच्‍छता मोहिमेत सहभाग घेतला.  या स्‍वच्‍छता मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget