728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

सिनेेरिव्ह्यु : 'घुमा' - शिक्षणासाठी होणारी घुसमट

मुंबई । DNA Live24 - (व्हिडिओ खाली दिलेला आहे)

नवोदित दिग्दर्शक महेश रावसाहेब काळे दिग्दर्शित 'घुमा' हा सिनेमा इंग्रजी शिक्षणाची कास धरू पाहणाऱ्या व आपल्या हुशार मुलाला इंग्रजी शाळेत पाठवू इच्छिणाऱ्या बापाच्या संघर्षाची कथा आहे. पण या सिनेमाच्या आशयामुळे ती एका व्यक्तीची कहाणी न उरता वैश्विक गोष्ट बनते.  उत्तम कार्यवाहीद्वारे, मनाला भिडणाऱ्या आणि एरव्ही डोळेझाक करणाऱ्या विषयाला मुख्य वाटेवर आणून त्यावर भाष्य करणारे चित्रपट कमी असतात. त्यात 'घुमा'चा समावेश होतो. 

(आम्हाला Facebook व Twitter वर फॉलो करा)

मुख्य भूमिकेत शरद जाधव, तर अन्य भूमिकेत पूनम पाटील, आदेश आवारे व अन्य कलावंतांनी, तर योगेश कोळी यांची छायाचित्रणासाठी व अपूर्वा साठे यांची संकलनाद्वारे उत्तम साथ दिली आहे. महेश काळे यांच्या रुपात मराठीला एका तरुण व उत्तम दिग्दर्शक मिळाला आहे. मराठीला जागतिक चित्रपटांच्या श्रेणीत नेण्याची अपेक्षा त्यांच्याकडून बाळगायला हरकत नाही.

या सिनेमाला 'डीएनए लाईव्ह२४ डॉट कॉम' देत आहेत ४ स्टार. घुमा सिनेमाचा रिव्ह्यु नेमका कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी सिनेस्थेशिया टीमचे सिने समीक्षक अविनाश पालकर व विराज मुनोत यांच्या टीमचा पुढील व्हिडिओ प्ले करा...


(आम्हाला Facebook व Twitter वर फॉलो करा)

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: सिनेेरिव्ह्यु : 'घुमा' - शिक्षणासाठी होणारी घुसमट Rating: 5 Reviewed By: DNA Live24