728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

आ. संग्राम जगतापांच्या काळात फेज टू योजनेचा फज्जा ! - सुवेंद्र गांधींचे टीकास्त्र


अहमदनगर । DNA Live24 - नगर शहरातील अत्यंत जिव्हाळ्याच्या फेज-दोन या पाणी योजनेचा बोजवारा महापौरपद भुषविताना आजच्या राष्ट्रवादीच्या आमदाराने उडविला हे नगरकरांना उत्तमरित्या माहिती असल्याची खरमरीत टीका नगरसेवक सुवेंद्र गांधी यांनी आमदार संग्राम जगताप यांच्यावर केली. फेज - २ च्या कामासाठी साठी राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली आपण आंदोलने का केली नाही ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

गेल्या चार दिवसांपासून सुरु असलेल्या राष्ट्रवादी - शिवसेना यांच्या वादात आमदार जगताप यांनी गांधी यांना ओढले. दोघांचे वाद सुरु असतांना राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपच्याही नगरसेवकांच्या वार्डात आ. संग्राम जगताप यांनी कामे केल्याचे सांगितले. भाजपला वादात ओढून चुकीची माहिती दिल्याने गांधी यांनी राष्ट्रवादी व आमदार जगताप यांचा समाचार घेतला.

गांधी म्हणाले की,  'राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जो दावा करत आहेत, तो फक्त कांगवा आहे. वास्तविक संग्रामभैय्या जगताप यांनी आमदार निधीतून कोण-कोणत्या प्रभागात कोण-कोणती विकास कामे केली? हे एक गुढच आहे. विकासकामे झाली असती, तर नगरकरांना किमान संबंधित प्रभागात राहणाऱ्या रहिवाशांना ती पहावयास मिळाली असती.

' शहराची आजची अवस्था बकाल झाली आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवात नगरकरांसह देखावे पाहण्यास आलेल्या पाहुण्यांनी हे जवळून पाहिले आहे. शहरातील रस्त्यांवर पथदिव्यांचे खांब उभारून त्यावर राष्ट्रवादीचे चिन्ह असलेले घड्याळ लावणे म्हणजे विकास नव्हे, असा देखील टोला गांधी यांनी लगवला आहे.

माजी महापौर शीला शिंदे यांच्या काळामध्ये मुलभूत विकासकामांसाठी आलेल्या राज्य सरकार व महानगरपालिका यांच्या समप्रमाणातील ४० कोटींच्या विकासकामांचे श्रेय राष्ट्रवादीच्या आमदाराने श्रीफळ वाढवून घेतले आहे. तसेच हा निधी युतीच्या व अन्य नगरसेवकांसाठी असतांना तो केवळ काँग्रेस आघाडीच्याच नगरसेवकांकडे वळविण्याचे कुटील कारस्थान केले असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.

 (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: आ. संग्राम जगतापांच्या काळात फेज टू योजनेचा फज्जा ! - सुवेंद्र गांधींचे टीकास्त्र Rating: 5 Reviewed By: DNA Live24