History of Maharashtra

शिवसेनेत पदाधिकाऱ्यांपेक्षा शिवसैनिकालाच सर्वात मोठा मान !

कोठी, सारसनगर परिसरातील धर्मवीर आण्णाभाऊ लष्करे युवा प्रतिष्ठाणचे बिरजू जाधव यांनी १५० युवकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले.

अण्णाभाऊ लष्करे युवा प्रतिष्ठाणचे १५० जण शिवसेनेत

अहमदनगर । DNA Live24 - भगवा झेंंडा म्हणजे शिवसेना. पण भगवा झेंडा म्हणजे काय हो ? जो भगवा रंग वापरतो, तो त्यागमयी जीवन जगतो, समाजासाठी त्याग करतो. युवकांचा 'फक्त वापर' हे शिवसेनेचे सूत्र नाही. त्याऐवजी नोकरी, व्यवसायासाठी शिवसेना युवकांच्या पाठीशी कायम उभी असते. पदाधिकाऱ्यांपेक्षा शिवसेनेत शिवसैनिकाला सर्वात मोठा मान आहे, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

कोठी, सारसनगर परिसरातील धर्मवीर आण्णाभाऊ लष्करे युवा प्रतिष्ठाणचे बिरजू जाधव यांनी १५० युवकांसोबत शिवसेनेत प्रवेश केला. त्याबद्दल त्यांचे स्वागत शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी शहर प्रमुख दिलीप सातपुते सभागृह नेता गणेश कवडे, माजी प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक सचिन जाधव, मनोज दुलम, दिंगबर ध्वन, अनिल बोरुडे, संभाजी कदम, युवासेना शहर प्रमुख ऋषभ भंडारी, राजू देठे, आदी उपस्थित होते.

 (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

राठोड म्हणाले, शिवसेना जातीवादी असल्याचा खोटा प्रचार इतर पक्ष करतात. शिवसेना हिंदूत्वाला, धर्माला मानते. याचा अर्थ दुसऱ्या धर्माला मानत नाही असा होत नाही. या देशामध्ये जी लोक राहतात त्यांचा धर्म हिंदू . धर्म कोणताही असो सर्वाचा धर्म महत्वाचा आहे. पक्ष कधीच वाईट नसतो किंवा संघटना कधीच वाईट नसते. नेतृत्व करणारे चांगले असले पाहिजे म्हणून शिवसेनेत युवकांचा कौल कायम वाढतच असतो. सर्व धर्माची शिवसैनिक शिवसेनेत आहे.

शिवसेनेत एकाच कुटुंबाचे वर्चस्व नाही सर्व सामान्याची शिवसेना. सामान्य माणसला मोठे करणारी शिवसेना. आपण सर्वानी समाजाचे, मुलींचे, माताचे, भगिणीचे, धार्मिक स्थळाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. धार्मिक स्थळामध्ये गुंड लोक घुसलेली आहे. फादर यांना मारहाणीचे प्रकार झालेत आणि हे प्रकार धर्म म्हणून शिवसेना कधीच खपवून घेणार नाही. कोणत्याही कामासाठी अडचणीसाठी तुम्ही मला समक्ष भेटू शकता. कोणालाही सोबत आणण्याची गरज नाही.

 (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

सर्वांना न्याय देण्यासाठी शिवसेना खंबीर आहे. शहरामध्ये अनेक पक्ष आहेत पण शिवसेनेतच कायम सामान्याना न्याय मिळतो. तरुण आणि विचारवंताचा सहभाग शिवसेनेत आहे. त्यामुळे शिवसेनेची ताकद कायम वाढतच आहे, असे मनोगत शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी व्यक्त केले. कार्यक्रमांचे सुत्रसंचालन शिक्षक सेनेचे पारुनाथ ढोकळे यांनी केले. तर आभार सभागृह नेता गणेश कवडे यांनी मांडले.

 (आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.)

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget