History of Maharashtra

‘स्वच्छ भारत’ विषयावर निबंध, शॉर्टफिल्म स्पर्धा

प्रथम क्रमांकास १५ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ५ हजार रुपये सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.


अहमदनगर । DNA Live24 - केंद्र व राज्य शासनाच्या वतीने स्वच्छ भारत मिशन हे अभियान जिल्हा परिषदेच्या वतीने राबविले जात आहे. ‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो’ या विषयावर निबंध व शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

‘स्वच्छ भारतासाठी मी काय करू शकतो’ या विषयावर मराठी, हिंदी, इंग्रजी या भाषेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. अठरा वर्षाखालील आणि अठरा वर्षांवरील वयोगटातील खुली निबंध व शॉर्टफिल्म स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

निबंधासाठी शब्द मर्यादा २५० शब्दांची आहे. शॉर्टफिल्मसाठी २ ते ३ मिनिटांचा वेळ असेल.  निबंध हा कल्पक व सुस्पष्ट विचार, साधी सरळ मांडणी, नवविचार, विषयाला पोहचवण्यासाठी परिणामकारक मांडणी असावी. निबंध व शॉर्टफिल्ममधील मजकूर हा स्पर्धकाचा स्वतःचा असावा. निबंध अथवा शॉर्टफिल्म असभ्य, भीतीदायक, मानहानीकारक, बदनामीकारक, लिंगभेदावर आधारीत, अश्‍लिल आणि सार्वजनिक उपयोगिताकरिता अनुपयुक्त  नसावा. निबंधातील मजकूर राष्ट्रीय, राज्यस्तरीय आणि स्थानिक कायद्याचा भंग करणारा नसावा.

निबंध अथवा शॉर्टफिल्म सादर करणार्‍या स्पर्धकांनी आपली सविस्तर माहिती, नाव, पत्ता, जन्मातारीख, संपर्कक्रमांक, ओळखपत्राची सत्यप्रत आदी माहिती स्वतंत्रपणे एका पानावर पाठवावी.प्रथम क्रमांकास १५ हजार, द्वितीय १० हजार, तृतीय ५ हजार रुपये सन्मानपत्र आणि प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

दि.६ सप्टेंबर२०१७ पर्यंत निबंध अथवा शॉर्टफिल्म जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागात सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी आमचे Facebook पेज लाईक करा आणि Twitter वर फॉलो करा.

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget