History of Maharashtra

एका केंद्र प्रमुखांसह १५ जणांना आदर्श शिक्षक पुरस्कार !

जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या आदर्श शिक्षकांची निवड काल मंगळवार (दि. २६) जाहीर करण्यात आली. एकूण १४ शिक्षक व एका केंद्र प्रमुखांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.


अहमदनगर । DNA Live24 - जिल्हा परिषदेच्या वतीने दरवर्षी दिल्या जाणार्‍या आदर्श शिक्षकांची निवड काल मंगळवार (दि. २६) करण्यात आली. जिल्हास्तरीय तपासणी पथकाकडे आलेल्या प्रस्तावाची शिक्षकांच्या परिक्षण अहवालांची सिलबंद पाकिटे काल सदस्य समितीपुढे उघडण्यात आली. लेखी परीक्षचे २५ गुण असे एकून १२५ गुणांचा तक्ता भरून घेण्यात आला. त्याआधारे शिक्षकांची निवड करण्यात आली. या गुणांचा अाधारे एकूण १४ शिक्षक व एका केंद्र प्रमुखांची जिल्हा पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

(Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

निवड झालेल्यांमध्ये गोपाळे दत्तू रखमाजी (पद्मावती नगर, अकोले), भोकनळ गोरक्ष मल्हारी (गुंजाळवाडी पठार, संगमनेर), खैरे मच्छिंद्र दत्तू (कोकमठाण, कोपरगांव), जाधव जगन्नाथ केसू (खर्डे पाटोळे, राहाता), शेळके श्रीकृष्ण शंकर (गोडेंगांव, श्रीरामपूर), धोंडीभाऊ भिवाजी सुंबे (गणेशवाडी, राहुरी), मिलिंद देविदास जामदार (दत्तवाडी, चांदा, नेवासा), सोमेश्वर हरिभाऊ सोनवणे (खामगांव, शेवगांव), धर्मा नवसाजी बडे (तीन खडी, पाथर्डी), हनुमंत रामराव निबांळकर (पिंपळगांव, जामखेड), विलास तुकाराम सोमवंशी (चंदे खुर्द, कर्जत), अनिल विठ्ठल उंडारे (वाळकी मळा, श्रींगोदा), जया जगन्नाथ कुलथे (पोखरकर, पारनेर), भाऊसाहेब धोंडीबा ठाणगे (हिवरे बाजार, नगर), व केंद्रप्रमुख चंद्रकांत धोेंडीबा कलगुंडे (कोळगांव ता. श्रीगोंदा) यांची निवड करण्यात आली.

या पुरस्कारर्थी शिक्षक व केंद्रप्रमुखांचे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, उपाध्यक्ष राजश्रीताई घुले यांनी अभिनंदन केले आहे. ही यादी विभागीय आयुक्तांच्या अंतिम मान्यतेसाठी पाठवली जाईल. यंदाच्या आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यावर निंबोडी येथील दुर्घटनेचे सावट आहे. त्यामुळे पुरस्कार वितरण सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. 

(Facebook पेज व Twitter वर फॉलो करा)

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget