History of Maharashtra

कृष्णप्रकाश, धनंजय मुंडेंच्या हस्ते १० ला 'शिवशंभोरत्न' पुरस्कार वितरण

गेल्या 20 वर्षापासून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय शिवशंभोरत्न पुरस्काराचे वितरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते १० सप्टेंबरला होणार आहे.


अहमदनगर । DNA Live24 - गेल्या 20 वर्षापासून दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय शिवशंभोरत्न पुरस्काराचे वितरण विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व मुंबई येथील विशेष पोलिस महानिरीक्षक कृष्णप्रकाश यांच्या हस्ते १० सप्टेंबरला होणार आहे. शिवशंभो प्रतिष्ठाण व आष्टी तालुका मित्र मंडळाच्या वतीने ओम गार्डन मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता हा सोहळा अायोजित केला आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिवाजी आण्णा कराळे यांनी दिली आहे.

स्व. मैनाबाई रामकृष्ण पवार आदर्शमाता पुरस्कार - हज्जन रशिदा अब्दुल रज्जाक इनामदार, कृषीरत्न पुरस्कार- बाबासाहेब पिसोरे, शिक्षकरत्न पुरस्कार - अविनाश बेडेकर, संगिता प्रमोद भापसे, रत्नाकर चव्हाण, मच्छिंद्र लोखंडे, महेश शिंदे, एकनाथ पालवे, नारायण शेंडे, समाजरत्न पुरस्कार - शाम तुकाराम सांगळे, उषा भाऊसाहेब जगदाळे, अंजली केवळ, संदिप सुरवसे, राजेंद्र धोंडिराम पवार, पत्ररत्न पुरस्कार - इक्बाल शेख, सुधीर लंके, रघुनाथ कर्डिले, ज्ञानेश दुधाडे, भिमराव गुरव यांना जाहीर झाला आहे.

साहित्यरत्न पुरस्कार- सुनिल वनाजी राऊत, इंद्रकुमार पांडुरंग झांजे, कलारत्न पुरस्कार - अविनाश कराळे, काजल शिरोळे व कोमल शिरोळे, उपक्रमशिल आदर्श शाळा पुरस्कार - जि. प. प्रा. शाळा टाकळी ढोकेश्‍वर यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कांतीलाल गर्जे, विनायक तळेकर,शिवाजी खुडे, विश्‍वजीत कराळे, उत्तम शिंदे, भास्कर पालवे, कुशल घुले ,विनोद मुळीक, सत्यजीत कराळे, महादेव आमले, दिलीप गारुडकर, बापुसाहेब फसले, मिलींद चवंडके, सुर्यकांत नेटके, बाबासाहेब मुळीक आदींनी केले आहे.

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget