728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

मोदींच्या कॅबिनेटध्ये आज मोठे फेरबदल ?


नवी दिल्ली । DNA Live24 - नरेंद्र मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये रविवारी नऊ नवीन मंत्र्यांचा समावेश करण्यात येणार आहे. हे सर्व खासदार राष्ट्रपती भवनात मंत्रीपदाची शपथ घेतील. यामध्ये बिहारचे आश्विनी चौबे आणि उत्तर प्रदेशचे शिव प्रताप शुक्ल यांच्यासह अनेक अनपेक्षित नावांचा समावेश आहे. या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोदींच्या नव्या कॅबिनेटच्या फेरबदलात जदयू आणि एआयडिएमकेच्या नेत्यांनाही स्थान दिले जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पण, नितिश कुमारांनी आपल्याशी कोणतीही चर्चा झाली नसून, आपल्या खासदारांनाही कोणतेही निमंत्रण नसल्याचे स्पष्ट केले आहे. सन २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूकीच्या २० महिने आधी केंद्रीय कॅबिनेटमध्ये हे फेरबदल करण्यात येत आहे. शनिवारपर्यंत ८ मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.

मोदींच्या नव्या कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातून कोणााची वर्णी लागणार असेल, तर शिवसेनेचे अनिल देसाई यांना मंत्रिपद दिले जाऊ शकते. भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांना मंत्री बनवले जाऊ शकते, अशी दाट शक्यता राजकीय वर्तुळात बोलून दाखवली जात आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र आपल्याला या बदलाबाबत काहीच माहिती नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्रीपदाबद्दल सध्या तरी साशंकता कायम आहे.

मला अद्याप कोणतीही माहिती नाही - उद्धव ठाकरे  - माध्यमांशी बोलताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, या मंत्रिमंडळ विस्ताराची माहिती मला माध्यमातूनच मिळाली. मी याबाबतीत भाजपकडे (भाजप केंद्रीय नेतृत्व) कोणतीही चौकशी केलेली नाही. मला कुणाकडूनच याबाबत अद्याप निरोप मिळालेला नाही, आम्हाला सत्तेचा मोहही नाही. दीर्घकाळापासून शिवसेनेची भाजपशी युती असूनही दोघांत नेहमी खटके उडत आले आहेत. सध्या मोदी सरकारमध्ये शिवसेनेचे एकमेव अनंत गीते मंत्री आहेत. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रालयाची जबाबदारी आहे.
ही आहेत नवीन नावे - 1) अश्विनी कुमार चौबे (बिहार), 2) शिव प्रताप शुक्ल (उत्तर प्रदेश), 3) वीरेंद्र कुमार (मध्यप्रदेश), 4) अनंत कुमार हेगडे (कर्नाटक), 5) राजकुमार सिंह (बिहार), 6) हरदीप सिंह पुरी (सीनियर ब्यूरोक्रेट), 7) गजेंद्र सिंह शेखावत (राजस्थान), 8) सत्यपाल सिंह (यूपी), 9) अल्फोन्स कन्ननथानम (केरळ).

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: मोदींच्या कॅबिनेटध्ये आज मोठे फेरबदल ? Rating: 5 Reviewed By: DNA Live24