History of Maharashtra

'पद्मावती'मधील 'दीपिका'चा 'फर्स्ट लुक' रिलीज : डिसेंबरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला

गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.


मुंबई । DNA Live24 - अभिनेत्री दीपिका पदुकोनची मुख्य भूमिका असलेल्या बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित ‘पद्मावती’ चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला आहे. राणी पद्मिनी अर्थात दीपिकाचा फर्स्ट लूक पद्मावती चित्रपटाच्या ऑफिशियल ट्विटर पेजवरुन शेअर करण्यात आला आहे.

नवरात्राचा मुहूर्त साधत गुरुवारी सुर्योदयाच्या वेळी फर्स्ट लूक रिलीज करण्यात आला. रणवीर, शाहीद, दीपिका आणि भन्साळी यांनी आधीपासूनच इन्स्टाग्रामवर त्याबाबत माहिती दिली होती. राणी पद्मावती तिच्या सौंदर्य, बुद्धी आणि साहसासाठी लोकप्रिय होती.

विशेष म्हणजे पद्मावती चित्रपट एप्रिल महिन्यात रिलीज होणार असल्याच्या चर्चा होत्या. परंतु चाहत्यांना आनंदाचा धक्का देत यावर्षीच हा सिनेमा प्रदर्शित करण्याचं भन्साळींनी जाहीर केलं आहे. एक डिसेंबर 2017 रोजी पद्मावती सिनेमागृहांमध्ये झळकेल.


पद्मावती चित्रपटात रणवीर सिंग अल्लाउद्दिन खिल्जीच्या भूमिकेत आहे. रणवीर सिंग पहिल्यांदाच खलनायकाची व्यक्तिरेखा साकारणार आहे. गोलियोंकी रासलीला-रामलीला, बाजीराव मस्तानी या चित्रपटांनंतर दीपिका-रणवीर ही जोडी तिसऱ्यांदा ऑनस्क्रीन एकत्र दिसणार आहे.

दिल्लीचा शक्तिशाली सुलतान असलेल्या अल्लाउद्दिन खिल्जीचा जीव राणी पद्मावतीवर जडला होता. या प्रेमातूनच त्याने तिच्या राज्यावर हल्लाबोल केला होता. मात्र त्याला शरण जाण्याऐवजी पद्मावतीने देहत्याग करणं पसंत केलं.


खिल्जी हा बायसेक्शुअल असल्याचं इतिहासाच्या पुस्तकात म्हटलं आहे. मुख्य सल्लागार असलेल्या मलिक काफूरवरही खिल्जीचं प्रेम होतं. गुजरातहून हजारो सुवर्णमुद्रा देऊन खिल्जीने एका तरुणाला विकत घेतलं. हाच तरुण भविष्यात मदुराईवर हल्ला करणारा सेनापती झाला, असं देवदत्त पटनाईकांनी लिहिल्याचं म्हटलं आहे.

दीपिका पदुकोण पद्मावतीची व्यक्तिरेखा साकारत असून शाहिद कपूर राजा रतन सिंह म्हणजे राणी पद्मिनीच्या पतीच्या भूमिकेत आहे. अदिती राव हैदरीही या चित्रपटात झळकणार आहे.
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget