728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

शिवप्रहारच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी किशोर जंगले


नेवासे । DNA Live24 - शिवप्रहार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी किशोर जंगले तर शिवप्रहार स्टुडंट्स फ्रंटच्या तालुकाध्यक्षपदी शुभम आगळे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर यांच्या उपस्थित नेवासा फाटा येथील शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच संघटनेची बैठक घेतली. यावेळी तालुका कार्यकारिणीची निवड केली.

तालुका कार्यकारिणी - सरचिटणीस अमित काळे, कार्यकारिणी सदस्य ज्ञानेश्वर जंगले, सल्लागार अर्जुन काळे तसेच खरवंडी जिल्हा परिषद गटप्रमुखपदी अभिजित दरंदले, कुकाणा जिल्हा परिषद गटप्रमुखपदी भरत खोमणे यांची निवड झाली. जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी सोमनाथ गायकवाड तर युवकच्या तालुकाध्यक्षपदी राहुल रोडे व उपाध्यक्षपदी अमोल चौधरी, संघटकपदी दीपक आगळे यांची निवड करण्यात आली.

शिवप्रहार स्टुडंट्स फ्रंटच्या तालुकाध्यक्षपदी शुभम आगळे यांची निवड केली. शिवप्रहार संघटनेचे अध्यक्ष संजीव भोर यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे दिली. नवनिर्वाचीत पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराचे बळी ठरत असलेल्यांच्या मदतीसाठी कटीबद्ध रहावे. त्यासाठी गावागावात शिवप्रहार संघटना पोहचविण्याचा प्रयत्न करावा अशा सूचना संजीव भोर यांनी यावेळी व्यक्त केल्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष सचिन चौगुले यांनी पुढील पंधरवड्यात पुन्हा बैठकीचे आयोजन करून उर्वरीत ईच्छूकांचा समावेश व कार्यकारणीचा विस्तार केला जाईल, असे सांगितले. प्रदेश सहसचिव सुनिल साळुंके यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत व अभिनंदन केले. बैठकीस रावसाहेब घुमरे, अनंत म्हसे, बहिरू गाडेकर, महेश शेवाळे, संदीप चौधरी, अमित तांगडे, गणेश चौगुले, दिपक आगळे, पूनम दरंदले, अतुल शेटे, रोशन शेळके आदी उपस्थित होते.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: शिवप्रहारच्या नेवासा तालुकाध्यक्षपदी किशोर जंगले Rating: 5 Reviewed By: DNA Live24