History of Maharashtra

नगरला एटीएम मशीन चोरणारी टोळी पुण्यात जेरबंद

नगर व पुणे जिल्ह्यातील विविध बँकांचे एटीएम मशीन चोरुन नेणाऱ्या टोळीतील सहा जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी चार लाख रुपयांची रोकड, एक स्कार्पिओ व एक मारूती कार जप्त केली आहे.


अहमदनगर । DNA Live24 - नगर व पुणे जिल्ह्यातील विविध बँकांचे एटीएम मशीन चोरुन नेणाऱ्या टोळीतील सहा जणांना पुणे ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले आहे. या टोळीकडून पोलिसांनी चार लाख रुपयांची रोकड, एक स्कार्पिओ व एक मारूती कार जप्त केली आहे. आरोपींनी नगर व पुणे जिल्ह्यात विविध ठिकाणी अशाप्रकारे एटीएम चोरल्याच्या सहा गुन्ह्यांची कबुली दिली आहे. यामध्ये नगर एमआयडीसीतील व सुपा परिसरातील एटीएम मशीनच्या चोरीच्या गुन्ह्यांचाही समावेश आहे.

जब्बार लालासाहेब शेख (वय ३०, रा. रायकर मळा, धायरी, मूळ जामखेड, जि. नगर), योगेश भानुदास कामठे (वय ३०) व सुहास दत्तात्रय निंबाळकर (वय २४, दोघेही गणेश पार्क, संतोषनगर, कात्रज, पुणे, मूूळ दिघी, ता. कर्जत, नगऱ), हणुमंत विष्णू वारे (वय २३), सुशिल विष्णू वारे (वय २४, दोघेही रा. रायकर मळ, धायरी पुणे, मूळ आघी, ता. जामखेड, नगर) व जगदीशसिंग उर्फ बबलू प्रेमसिंग यादव (वय २५, वडगाव बुद्रूक, हवेली, पुणे, मूळ रा. उत्तर प्रदेश) अशी आरोपींची नावे आहेत.

शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत 23 ऑगस्टला सात ते आठ अज्ञात चोरट्यांनी पहाटे चार वाजता शिक्रापुर पाबळ रस्त्यावरील भारतीय स्टेट बँकेचे एटीएम मशीन व त्यामधील रोख रक्कम रुपये 15 लाख 62,000 हजार रुपये चोरून नेले होते. यासंबधी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये घरफोडीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना नऊ जणांच्या टोळीने गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यापैकी ५ आरोपी हे नगर जिल्ह्यातील, तर उर्वरित चाैघे उत्तरप्रदेश मधील आहेत.

यापैकी ६ आरोपींना पुणे ग्रामीणच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली एकूण दोन वाहने, रोख रक्कम तीन लाख 93 हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यांनी मोडून टाकून दिलेले एटीएम मशीन कर्जत येथून पोलिसांनी हस्तगत केले आहे. सध्या हे आरोपी शिक्रापूर पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर, लोणी काळभोर, भिगवण, तसेच नगर जिल्ह्यातील एमआयडीसी व सुपा पोलिस ठाण्याच्या हद्दीत असेच गुन्हे केले आहेत.

पकडलेले पाच आरोपी नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील मूळ रहिवासी आहेत. मात्र, सध्या पुण्यातील वडगाव धायरी, गणेश पार्क, कात्रज, रायकर मळा, वडगाव बुद्रुक, आदी ठिकाणी वास्तव्याला होते. कामाच्या निमित्ताने एकत्र आल्यानंतर त्यांच्या ओळखी झाल्या. त्यातूनच त्यांनी एटीएम चोरायची शक्कल लढवली. अन एकत्र टोळी करुन त्यांनी सहा ठिकाणी गुन्हे केले. त्यांना नगर पोलिस जेव्हा वर्ग करुन घेतील. त्यांच्याकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे.

आमचे Facebook पेज लाईक करा व Twitter वर फॉलो करा.

Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget