History of Maharashtra

स्वच्छतेच्या सवयीतून आरोग्याचे प्रश्‍न सुटतील : मुख्य सचिव श्यामलाल गोयल

स्वच्छता हि सेवा या अभियानाचा शुभारंभ नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे शुक्रवारी करण्यात आला.

हिवरेबाजार येथे ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानाचा शुभारंभ


अहमदनगर । DNA Live24 - ग्रामीण भागातील आरोग्याचे प्रश्‍न सुटण्यासाठी स्वच्छतेच्या सवयीला अतिशय महत्त्व आहे. घराची स्वच्छता ठेवतानाच संपूर्ण गाव केंद्रबिंदू मानून स्वच्छतेच्या कामात प्रत्येकाने योगदान दिले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांना गावागावातून सामूहिक प्रयत्नांची जोड मिळाल्यास संपूर्ण राज्य स्वच्छतेच्या बाबतीत आदर्श बनेल. चांगले आरोग्य, चांगली शिस्त ठेवण्यासाठी स्वच्छत महत्त्वाची असून आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठीही हा महत्त्वाचा घटक आहे, असे विचार राज्याच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे अप्पर मुख्य सचिव श्यामलाल गोयल यांनी मांडले.

राज्य सरकारच्या स्वच्छता हि सेवा या अभियानाचा शुभारंभ नगर जिल्ह्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथे शुक्रवारी करण्यात आला. दि.१५ सप्टेंबर ते दि.२ ऑक्टोबर या कालावधीत होणार्‍या या अभियानात विविध उपक्रम राबवून महाराष्ट्राला हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. या अभियानाच्या शुभारंभावेळी मार्गदर्शन करताना अप्पर मुख्य सचिव गोयल बोलत होते.

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी वारकर्‍यांसह विविध वेशभूषा परिधान करून गावातून स्वच्छता दिंडी काढली. या स्वच्छता दिंडीत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थही मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. या शुभारंभ कार्यक्रमास पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपसचिव रूपेश जयवंशी, नगर जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उज्वला बावके, कार्यकारी अभियंता सुरेंद्रकुमार कदम, विजय गवळी, डॉ.वसंत गारूडकर आदी उपस्थित होते.

उपसचिव रूपेश जयवंशी म्हणाले की, स्वच्छतेच्या संपूर्ण राज्यातील या अभियानाचा शुभारंभ आदर्श गाव हिवरेबाजार येथे करताना विशेष आनंद होत आहे. हिवरेबाजारातून निर्माण झालेली स्वच्छतेची उर्जा संपूर्ण राज्यासाठी पथदर्शी ठरेल. या पंधरवड्यात स्वच्छतेची कामे दुप्पट गतीने होवून लवकरच महाराष्ट्र हागणदारीमुक्त बनेल असा विश्‍वास वाटतो.

जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी माने म्हणाले की, नगर जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान विशेष प्रयत्नांव्दारे राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख १६ हजार शौचालयांची कामे प्रगतीपथावर आहे. ही सर्व कामे या पंधरवड्यात युध्द पातळीवर पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील. या कालावधीत शौचालय उभारणीचे काम तीनपट गतीने करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.टी.पादीर यांनी केले. कार्यक्रमास सुभाष कराळे, रामभाऊ चत्तर, सचिन थोरात, उत्तमराव संभळे, हरिभाऊ ठाणगे, विठ्ठल ठाणगे, अर्जुनराव पवार, रावसाहेब पवार, रोहिदास पादिर, सचिन थोरात, कुमार खेडकर, विजय गवळी आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
Labels:
Reactions:

टिप्पणी पोस्ट करा

ताज्या बातम्या

[recent][timeline]

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा समर्थित.
Javascript EnablePlease Enable Javascript To See All Widget