728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

पैसे परत हवेत? मग आत निर्णायक लढ्याची वेळ..

पॅनकार्ड क्लब गुंतवणुकदारांची महत्वाची बैठक

अहमदनगर । DNA Live24 - पॅनकार्ड क्लब कंपनीच्या गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी सेबीकडून दिरंगाई होत आहे. त्यामुळे गुंतवणुकदारांनी आपले अर्ज भरुन सेबीच्या मुख्य कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन बँक कामगार नेते विश्‍वास उटगी यांनी केले. काटवन खंडोबा रोडवरील सप्तपदी मंगल कार्यालयात झालेल्या गुंतवणुकदारांच्या बैठकीत ते बोलत होते.

याप्रसंगी मुंबईचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक गोरे, अध्यक्ष अरविंद पेडणेकर, राजू देसले, सचिव विशाल बर्डे, खजिनदार विजय गोसावी, नगर प्रतिनिधी मोहन आकुबत्तीन, लक्ष्मण गुरप, संतोष सोनटक्के, राजेश आकुबत्तीन आदिंसह जिल्ह्यातील गुंतवणुकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीत देशभरातून लाखो जणांनी गुंतवणुक केली आहे. सेबीने पॅनकार्ड क्लबला नोटीस पाठवून गुंतवणूक घेण्यास प्रतिबंध करुन गुंतवणुकीची रक्कम गुंतवणूकदारांना परत करण्यास सांगितले. मात्र पॅनकार्ड क्लब कंपनीने गुंतवणूकदारांची रक्कम परत केली नाही. न्यायालयाने सेबीला मालमत्ता विक्री करुन गुंतवणुकदारांचे पैसे अदा करण्याचे आदेश दिले. मात्र सेबीकडून मालमत्तेचा कुठलाही लिलाव झालेला नसून गुंतवणुकदारांचे पैसे परत करण्यासाठी दिरंगाई होत आहे.

देशात जवळपास ५१ लाख व महाराष्ट्रात २७ लाख गुंतवणुकदार आहेत, अशी माहिती विशाल बर्डे यांनी दिली. यावेळी मुंबईचे सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक गोरे यांनी इन्व्हेस्टर अ‍ॅक्शन फोरम चॅरिटेबल ट्रस्ट  या गुंतवणुकदारांच्या संघटनेच्या माध्यमातून भारतभर सभा घेऊन गुंतवणुकदारांची चळवळी सुरु केल्याचे सांगून कायदेशीर लढ्याबाबत मार्गदर्शन केले.

अध्यक्ष अरविंद पेडणेकर यांनी सर्व गुंणवणुकादारांची विराट निवेदन रॅली लवकरच सेबीच्या मुंबई ऑफिसवर निघणार आहे, ज्याद्वारे आम्ही गुंतवणुकादार सेबीला विनंती करणार आहोत, कि आमचे पैसे लवकरच लवकर परत द्यावेत असे सांगितले. तसेच यासाठी सर्व गुंतवणुकदारांनी या लढ्यात सामिल होण्याचे आवाहन केले.

मोहन आकुबत्तीन म्हणाले, नगरमधील सर्व गुंतवणुकदारांच्या वेळोवेळी बैठका झाल्या आहेत. या बैठकीत देशपातळीवर नेतृत्व करत असलेल्या मान्यवरांनी आपली भुमिका मांडली. त्या भुमिकेस नगरमधील प्रतिनिधी व गुंतवणुकदारांनी पाठिंबा देऊन मुंबई येथील सेबीच्या मुख्य कार्यालयावर निघणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन केले.

  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: पैसे परत हवेत? मग आत निर्णायक लढ्याची वेळ.. Rating: 5 Reviewed By: DNA Live24