Header Ads

 • Breaking News

  गाळे धारकांचा सामूहिक आत्मदहनाचा इशारा

  अहमदनगर । DNA Live24 - विकासाचे दिवास्वप्न दाखवून प्रोफेसर कॉलनीतील गाळेधारकांची फसवणूक व शहराचे वाटोळे करण्याचे उद्योग मनपातील सत्तारुढ नेते करीत आहेत. गाळेधारकांच्या पुनर्वसनाबाबत केवळ तोंडी आश्‍वासने, निरोपच देण्यात आले आहे. नेहरु मार्केट प्रमाणेच प्रोफेसर कॉलनीची इमारत पाडून आम्हाला रस्त्यावर बसण्याचे वेळ येणार आहे. या विरोधात आम्ही कायदेशीर लढा देणार आहोत, वेळ पडल्यास कुटुंबियांसह सामुहीक आत्मदहन करू, असा इशारा गाळेधारकांनी पत्रकाद्वारे दिला आहे.

  पत्रकावर जोगिंदर आहुजा, नेमीचंद गांधी, नितीन गांधी, प्रदीप सोलट, प्रकाश सोलट, नारायण बुर्‍हेळे, जयंत रंगा, जयश्री मोरे, वैशाली मोरे, सुनीता परदेशी, मनीषा भळगट, राजेश हर्दवाणी, कोमल हर्दवाणी, सुनील थोरात, अजीत हर्दवाणी, यशवंत सहकारी ग्राहक संस्था, संजीव दायमा, दिगंबर मान्या, सचिन शीलावत, भरत कुकरेजा, दुर्गा कुकरेजा, विनोद पोकळे आदींची नावे आहेत.

  स्थायी समितीने प्रोफेसर कॉलनी व्यापारी संकुलाची निविदा नुकतीच मंजूर केली. प्रशासनालाही निवेदन देण्यात आले होते. मात्र, त्याची दखल न घेण्यात आल्यामुळे गाळेधारकांनी काल निवेदन प्रसिध्दीस दिले असून यात कायदेशीर लढाईसह सामुहीक आत्मदहनाचा इशारा दिला आहे. अभिषेक कळमकर महापौर असताना याच शिवसेनेच्या नेत्यांनी या संकुलाला विरोध केला होता.

  मात्र, आता त्यांना याचा विसर पडला आहे. त्यांचे व त्यांच्या नेत्यांचे गाळेही या संकुलात आहेत. ते वापरात नसल्याने त्यांना याचे गांभीर्य नाही. आम्ही 25 वर्षांपासून येथे व्यवसाय करत आहोत. या निर्णयामुळे गाळेधारकांवर रस्त्यावर बसण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे आम्ही या विरोधात कायदेशीर लढा देणार आहोत. वेळप्रसंगी 

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad