Header Ads

 • Breaking News

  मुंबई, नाशिक, पुण्यात मतदानाचा उत्साह

  मुंबई, पुणे । DNA Live24 - मुंबईसह महाराष्ट्रातील १० महानगरपालिका, ११ जिल्हा परिषदांसाठी तर ११८  पंचायत समित्यांसाठी मंगळवारी सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदानास सुरूवात झाली. देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेसाठी मंगळवारी सकाळीच अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी आणि सेलिब्रिटींनी मताधिकार बजावला. राज्यातील महानगरपालिकेसाठी सकाळी ११.३०वाजेपर्यंत १७.०७टक्के मतदान झाले होते. नागपूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस व मातोश्री सरिता फडणवीस यांच्यासह मताधिकाराचा हक्क बजावला.

  मुंबई महानगरात राज्यात सर्वाधिक उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. एकूण २२७ जागांसाठी २,२७५ उमेदवार लढत देत आहेत. याशिवाय नागपूर, ठाणे, उल्हासनगर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती या महानगरपालिकामध्येही आज मतदान झाले.  रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, गडचिरोली या जिल्हा परिषदांमध्येही आजच मतदान झाले. वर्धा, यवतमाळ याठिकाणच्या काही जागांसाठीही मतदान झाले. जिल्हा परिषदेच्या ६५४ जागांसाठी २ हजार ९५६; तर पंचायत समित्यांच्या १ हजार २८८ जागांसाठी ५ हजार १६७ उमेदवारांमध्ये लढत झाली. 

  मुंबईमध्ये आज सकाळीच राजकीय दिग्गजांनी मताधिकार बजावला. आतापर्यंत शिक्षण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे, परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत आपली नात रेवती सुळे हिच्यासह मतदान केले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी, मनसे प्रमुख राज ठाकरे, खासदार पूनम महाजन, मुख्य निवडणूक आयुक्त जे.एस. सहारिया, महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता, पोलीस सहआयुक्त देवेन भारती यांनीही मतदान केले.

  याशिवाय अभिनेत्री तथा खासदार रेखा, अभिनेते सुनील बर्वे, रणबीर सिंग, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सोनम कपूर, श्रद्धा कपूर, अनुष्का शर्मा, सुप्रसिद्ध उद्योजक टीना अंबानी, क्रिकेटपटू संदीप पाटील यांनी सकाळीच मताधिकार बजावला. यावेळी मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

  नागपुरात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पुण्यात अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, अकोल्यात गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, सोलापूरमध्ये सहकारमंत्री सुभाष देशमुख, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे, सोलापूरचे पालकमंत्री विजय देशमुख, ठाण्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही सकाळी मतदानाचा हक्क बजावला.

  [pslide]
      [item url="#" src="https://2.bp.blogspot.com/-EhIPo__rAdQ/WKvc5W4wJmI/AAAAAAAAAsU/FXGL5pWUrYgZY5jZSDXQQ8WBecuj53-fQCLcB/s640/IMG-20170221-WA0004.jpg" title="पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांचे कुटुंबियांसह मतदान"]पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासमवेत त्यांची पत्नी तसेच मुलगा गौरव बापट [/item]
      [item url="#" src="https://4.bp.blogspot.com/-UTvGQU4RT-0/WKvc5DpWsLI/AAAAAAAAAsQ/rVcY1LrSPCIciR2-YkKJR_j0-RVz4l4TACLcB/s640/IMG-20170221-WA0005.jpg" title="खासदार वंदना चव्हाण"]कुटुंबियांसमवेत मतदान करताना.[/item]
      [item url="#" src="https://3.bp.blogspot.com/-anKPs5LvsH0/WKvc4fuLQsI/AAAAAAAAAsM/0OsihmHQzCsBzx4tYOxJvP30Hx4dgTsBwCLcB/s640/Sharad-Pawar-with-revati.jpg" title="राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार"]राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची नात (सुप्रिया सुळे यांची मुलगी) रेवती हिच्या समवेत मतदान मतदानाला जाताना [/item]
      [item url="#" src="https://4.bp.blogspot.com/-XeoB7Oo0wkc/WKvqIMNM-bI/AAAAAAAAAtQ/fnw2EmfSIrcyRmGseL2psi4XRuvEgNwsgCLcB/s320/IMG-20170221-WA0012%2B%25281%2529.jpg" title="केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर "]पुण्यात मतदान करताना [/item]
      [item url="#" src="https://2.bp.blogspot.com/-qd0VIvCrvi0/WKvqH4lHBsI/AAAAAAAAAtM/z_B6yHcOw7Q5Tg5VXIqXQBr2GA_0cemuACLcB/s320/IMG-20170221-WA0010.jpg" title="खासदार हेमंत गोडसे, नाशिकमध्ये "]मतदान झाल्यावर [/item]
      [item url="#" src="https://2.bp.blogspot.com/-DSFoOZRKNLg/WKvqF5bAY8I/AAAAAAAAAtA/DMnHhGNLbp4B_ULR0tyBja7-n3DVNa49gCLcB/s320/IMG-20170221-WA0007.jpg" title="नाशिकचे उपमहापौर गुरमित बग्गानी, नाशिकमध्ये "]मतदान झाल्यावर [/item]
      [item url="#" src="https://4.bp.blogspot.com/-Wzj_QvRv_Pc/WKvqFTo5r7I/AAAAAAAAAs8/o6EZdYzYtFUE03Ik6ei_rasunT2OyvBUACLcB/s320/IMG-20170221-WA0006.jpg" title="नाशिकचे महापौर अशोक मुर्तडक "]मतदान झाल्यावर [/item]
  [/pslide]

  कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

  Post Top Ad

  Post Bottom Ad