728x90 AdSpace

[recent][timeline]
Latest News

थिएटरमध्ये राष्ट्रगीतानंतर दिसणार तंबाखूविरोधी संदेश

मनाेरंजन । DNA Live24 - चित्रपटगृहांमध्ये राष्ट्रगीत वाजवल्यानंतर तंबाखू विरोधी संदेश देणाऱ्या ध्वनीचित्रफिती प्रदर्शित केल्या जाव्यात, अशा सूचना केंद्रीय चित्रपट प्रमाणपत्र मंडळाचे (सीबीएफसी) अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी केली आहे. सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन अधिनियमांतर्गत चित्रपट नियमाच्या अंमलबजावणीसंदर्भात आयोजित एका चर्चासत्रात ते बोलत होते. यावेळी कुटुंब कल्याण सचिव सी. के. मिश्रा, माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल हे उपस्थित होते. यापूर्वी सिनेमागृहात राष्ट्रगीत सादर करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

देशातील नागरिकांवर चित्रपट उद्योगाचा मोठा प्रभाव आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर लोक चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी जात असतात. यावेळी तंबाखू आणि त्याच्या दुष्परिणामांशी मुकाबला करण्यासाठी दाखवण्यात येणारे तंबाखूविरोधी संदेश प्रभावी ठरतील, असे या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील २२ टक्के कार्यक्रमांमध्ये तंबाखूजन्य उत्पादनाचा वापर होत असल्याचे दाखवण्यात येते, त्यापैकी ७१ टक्के कार्यक्रम लहान मुले आणि किशोरवयीन मुले पाहतात असेही या अभ्यासात स्पष्ट झाले आहे. 

तंबाखूमुळे त्याचे सेवन करण्याच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ वाया जातो. हे थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे निहलानी यांचे म्हणणे आहे. तंबाखूचे दुष्परिणाम सांगत त्याच्या वापरावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, असे सी. के. मिश्रा यावेळी म्हणाले. तंबाखू विक्रेत्यांनीही तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत ग्राहकांना इशारा दिला पाहिजे, अशी अपेक्षा माहिती आणि प्रसारण सचिव अजय मित्तल यांनी यावेळी व्यक्त केली.
  • Google Comments
  • Facebook Comments
Item Reviewed: थिएटरमध्ये राष्ट्रगीतानंतर दिसणार तंबाखूविरोधी संदेश Rating: 5 Reviewed By: DNA Live24